27 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरक्राईमनामादिशा सालियनचा मृत्यू कसा झाला? सीबीआय तपासात झाले उघड

दिशा सालियनचा मृत्यू कसा झाला? सीबीआय तपासात झाले उघड

दिशा सालियनच्या मृत्यूचे सत्य समोर आले आहे.

Google News Follow

Related

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियनच्या मृत्यूचे सत्य समोर आले आहे. सीबीआयने सखोल तपासानंतर दिशा सालियनचा मृत्यू अपघाती असल्याचा निष्कर्ष काढला आहे. दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाचा सुशांत सिंगच्या मृत्यू प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे सीबीआयकडून स्पष्ट झाले आहे.

सुशांतसिंग राजपूत प्रकरणात सीबीआयकडून सुरू असलेल्या तपासात दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचाही तपास करण्यात आला. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सीबीआयने वेगळा गुन्हा दाखल केला नव्हता मात्र सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात हे प्रकरणही तपासण्यात आले आहे.

सीबीआयने अहवालात म्हटले आहे की, सुशांत सिंग राजपूतची माजी व्यवस्थापक असलेली दिशा सालियन अपघाताच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत होती. त्यादरम्यान तिचा तोल गेल्याने ती छतावरून पडली आणि तिचा मृत्यू झाला आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात कोणताही राजकीय अँगल नाही शिवाय साक्षीदारांचे जबाब, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि इतर तथ्यांच्या आधारे सीबीआयने हा निष्कर्ष काढला आहे.

हे ही वाचा : 

‘ज्यांनी बाळासाहेबांना विरोध केला, त्यांना आदित्य भेटणार’

व्हासटऍप व्हिडीओ कॉल आला आणि तरुण अडकला जाळ्यात

अस्सलाम वालेकुम लाचारांनो, अतुल भातखळकरांनी डिवचले

नशीब बलवत्तर… न्यूझीलंडचे ‘टाय टाय’ फीश

दरम्यान, दिशा सालियनच्या मृत्यूबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत खळबळजनक दावा केला होता. सुशांत राजपूत आणि सालियन या दोघांची हत्या झाल्याचा दावा राणे यांनी केला होता. सालियनवर बलात्कार झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र, दिशाच्या कुटुंबीयांनी भावनिक आवाहन करत या प्रकरणाला राजकीय मुद्दा न बनवण्याचे आवाहन केले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा