पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादेत झालेल्या हिंसाचारामुळे देशभरात खळबळ उडाली. या दंगलीमध्ये हिंदूंना लक्ष्य करण्यात आले शिवाय तीन जणांचा यात मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाले असून मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने तृणमूल काँग्रेसवर या हिंसाचारासाठी निशाणा साधला आहे. पश्चिम बंगाल भाजपा प्रमुख सुकांत मजुमदार म्हणाले होते की, जोपर्यंत ममता बॅनर्जी इच्छित नाहीत तोपर्यंत राज्यातील हिंसाचाराच्या घटना कमी होणार नाहीत. अशातच सुकांत मजुमदार यांनी मोठा दावा केला आहे.
सुकांत मजुमदार यांनी बुधवारी मुर्शिदाबाद हिंसाचाराबद्दल डीजीपी राजीव कुमार यांची भेट घेतली. यानंतर मजुमदार यांनी दावा केला की, दंगलीचे आवाहन हे मशिदीच्या लाऊडस्पीकरवरून करण्यात आले होते. पीडितांच्या म्हणण्यानुसार, दंगलीचे आवाहन मशिदीच्या लाऊडस्पीकरवरून करण्यात आले होते, असा गंभीर आरोप सुकांत मजुमदार यांनी पीडितांच्या कथनांचा हवाला देत केला आहे.
मजुमदार यांनी तृणमूल सरकारवरही टीका केली. “तव्वाह सिद्दीकी याने केलेले चिथावणीखोर विधान अत्यंत लज्जास्पद आहे. त्यांच्या टक्केवारीत वाढ आणि लोकसंख्या शास्त्रातील बदलामुळे ही मानसिकता वाढत आहे. ही मानसिकता ममता बॅनर्जी यांच्या सरकारकडून त्यांना आश्रय मिळत असल्याने आहे. पीडितांच्या मते, दंगलीचे आवाहन मशिदीच्या लाऊडस्पीकरवरून करण्यात आले होते,” असे त्यांनी बोलताना एएनआयला सांगितले. जर भाजपाचे सरकार पश्चिम बंगालमध्ये आले तर धार्मिक स्थळांमध्ये अशा प्रकारच्या होणाऱ्या कारवायांवर बंदी घालण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा :
एसआयटी करणार मुर्शीदाबाद दंगलीची चौकशी
संसदेत मंजूर झालेला कायदा राज्यात लागू न करण्याचा अधिकार ममतांना कोणी दिला?
“जर अमेरिका टॅरिफ नंबर गेम खेळत राहिली तर…” काय म्हणाला चीन?
‘वक्फ सुधारणा विधेयक’: सर्वोच्च न्यायालयाकडून कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती नाही!
हिंसाचाराच्या आधी मुर्शिदाबादमध्ये पीएफआय सक्रिय असल्याचा दावाही त्यांनी केला. पीएफआय मुर्शिदाबादमध्ये सक्रिय होता तरीही पश्चिम बंगाल पोलिसांनी आतापर्यंत एकही अटक केलेली नाही. त्यांनी पुढे म्हटले की, मुर्शिदाबाद आणि शमशेरगण या हिंसाचारग्रस्त भागातील लोक मालदा येथे स्थलांतरित झाले आहेत आणि निर्वासित छावण्यांमध्ये राहत आहेत. पश्चिम बंगाल पोलिसांनी हिंसाचाराच्या संदर्भात आतापर्यंत १५० जणांना अटक केली आहे.