25 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरक्राईमनामाबेपत्ता पणन सहसंचालक घोरपडेंचा मृतदेह सापडला

बेपत्ता पणन सहसंचालक घोरपडेंचा मृतदेह सापडला

शशिकांत घोरपडे यांचा मृतदेह सापडला आहे.

Google News Follow

Related

महाराष्ट्र राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे हे गेले दोन दिवस बेपत्ता होते. गेले दोन दिवस NDRF टीम आणि स्थानिक गिर्यारोहण यांची टीम शोध घेत होती. अखेर आज त्यांचा मृतदेह सापडला आहे. शशिकांत घोरपडे यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

महाराष्ट्र राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत पतंगराव घोरपडे (वय ४८) हे बुधवार, १२ आक्टोबरपासून बेपत्ता होते. या प्रकरणी सातारा जिल्ह्यातील शिरवळ पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

शशिकांत घोरपडे हे बुधवारी दुपारी त्यांच्या पुणे येथील कार्यालयातून बाहेर निघाले होते. मात्र, बराच वेळ होऊनही ते घरी गेले नाहीत म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. दरम्यान त्यांची गाडी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास टोलनाका पास करून साताराच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांच्या मोबाईलचे लोकेशन पाहिले असता शेवटचे लोकेशन सारोळा निरा नदीपुलाजवळ असल्याचे लक्षात आले. तसेच घोरपडे यांच्याकडे असलेली त्यांच्या मित्राची गाडीदेखील ब्रिजजवळ असलेल्या हॉटेल समोर मिळाली. त्यानुसार घोरपडे यांचे बंधू श्रीकांत घोरपडे यांनी शिरवळ पोलिस ठाण्यात बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली होती.

हे ही वाचा:

न्यायालयाच्या आदेशानंतर ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर

राणा आयुबचे ईडीने १ कोटी ७७ लाख रुपये गोठवले

आमिरवर जाहिरातीतून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

चीनमध्ये शी जिनपिंग यांच्या विरोधात बॅनर झळकले

त्यानंतर निरा नदीच्या पुलाच्या भिंतीलगत त्यांचा मृतदेह सापडला आहे. शशिकांत घोरपडे यांनी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या केली याचा तपास पोलीस करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा