26 C
Mumbai
Thursday, January 9, 2025
घरक्राईमनामावरळी सी- फेसवर गोणीत आढळला तरुणीचा मृतदेह

वरळी सी- फेसवर गोणीत आढळला तरुणीचा मृतदेह

पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू

Google News Follow

Related

मुंबईतील वरळी सी- फेसवर एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. एका गोणीत तरुणीचा मृतदेह हात- पाय तुटलेल्या अवस्थेत आढळून आला असून वरळी पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मृत तरुणीचे वय १८ ते २० वर्षांच्या दरम्यान असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

वरळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरळी सी फेसवर एका गोणीत तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. या तरुणीचं वय १८ ते २० वर्षांच्या दरम्यान असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. तसेच तरुणीची हत्या करून पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली आहे, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे. वरळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

हे ही वाचा:

शस्त्रे लुटण्यासाठी आलेल्या जमावाला लष्कराने रोखले; एक ठार

अमेरिकी वृत्तपत्रांकडून भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमांचे कौतुक

वेस्ट इंडीजला पराभूत करणाऱ्या झिम्बाब्वेचेही आव्हान संपुष्टात

अजित आगरकर भारताचे नवे राष्ट्रीय क्रिकेट निवड समिती प्रमुख

या घटनेमुळे राज्याच्या राजधानीच्या शहरातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकादा चर्चत आला आहे. काही दिवसांपूर्वी परीक्षेला जाणाऱ्या एका तरुणीवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मस्जिद बंदर स्थानकादरम्यान एका व्यक्तीने धावत्या लोकलमध्ये लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. तर त्यानंतर काही दिवसांनीचं चर्नी रोड ते चर्चगेट स्थानकादरम्यान लोकलमध्ये एका महिलेचा अज्ञाताकडून विनयभंग करण्यात आला होता. त्यामुळे मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या उपनगरीय रेल्वेमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता वरळी सी फेसवर आढळलेल्या मृतदेहामुळे मुंबईतील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा प्रकाशझोतात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा