भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या निवास्थानाबाहेर रविवार, १० जुलै रोजी पहाटे एक बॅग सापडली. या बॅगेमुळे खळबळ उडाली होती. या बॅगेत चलनी नाणी, दागिने आणि देवांच्या मूर्ती असा ऐवज आहे. एका अज्ञात व्यक्तीने आज पहाटे घराबाहेर बॅग ठेवल्याचे समोर आले आहे. दरम्यान, याबाबत माटुंगा पोलीस अधिक तपास करत आहेत.
आज पहाटे साडेपाच- सहाच्या सुमारास प्रसाद लाड यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना संपर्क करून निवासस्थानासमोर एक बॅग असल्याची माहिती दिली. त्या बॅगेत तीन वेगवेगळ्या बॅग होत्या. त्यानंतर याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथकाने घटनास्थळी पोहोचून बॅगेची पाहणी केली.
पोलिसांना या बॅगेत दागिने, पैसे, मूर्ती असा ऐवज आढळून आला. प्रसाद लाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, “माझ्या घराबाहेर २४ तास पोलिस संरक्षण असते. पोलिसांना संशयित व्यक्ती दिसली होती. पोलिसांनी हटकले असता त्याने बॅग टाकून पळ काढला,” अशी माहिती लाड यांनी दिली.
हे ही वाचा:
एलन मस्क म्हणजे तिकीट नसलेले प्रवासी; ट्विटर करार रद्द केल्यानंतर महिद्रांनी लगावला टोला
गौतम अदानींची होणार टेलिकॉम क्षेत्रात एन्ट्री?
राज्याच्या विकासात केंद्राचा मोठा वाटा…म्हणून पंतप्रधान मोदींची भेट
श्रीलंकेच्या पंतप्रधानांचा राजीनामा; आंदोलकांनी रानिल विक्रमसिंघेंचं खासगी घर पेटवले
दरम्यान, बॅगेतील ऐवज हा प्रसाद लाड राहत असलेल्या इमारतीच्या बाजूच्या इमारतीतील घरातून चोरी झालेला ऐवज असावा असा पोलिसांना संशय आहे. देवघरातील साहित्य चोरण्यात आल्याप्रकरणी माटुंगा पोलिसांकडे यापूर्वीच एक तक्रार दाखल झाली असून गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.