रोट्या बनवण्यापूर्वी आलम त्यावर थुंकायचा, व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी आवळल्या मुसक्या !

पोलिसांकडून आरोपीला अटक, नागरिकांकडून संताप

रोट्या बनवण्यापूर्वी आलम त्यावर थुंकायचा, व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी आवळल्या मुसक्या !

उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये खाद्यपदार्थांवर थुंकण्याचे एक प्रकरण समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. व्हिडीओमध्ये एका ढाब्यावर रोट्या बनवणारा कारागीर त्यावर थुंकत असल्याचे दिसत आहे. या कारागिराचे नाव आलम असे असून त्याला पोलिसांनी मंगळवारी (१७ सप्टेंबर) अटक केली आणि ढाबा बंद करण्यात आला आहे. आरोपी आलम गेल्या ८ वर्षांपासून या ढाब्यावर काम करत असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण नोएडाच्या दनकौर पोलीस स्टेशन भागातील आहे. सोमवारी (१६ सप्टेंबर) हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हायरल झालेला व्हिडिओ सितारगंज रोडवरील वकील शाही चिकन कॉर्नर नावाच्या ढाब्या मधील आहे. ढाब्याच्या बाहेर उभ्या असलेल्या एका व्यक्तीने सुमारे ३७ सेकंदांचा हा व्हिडिओ बनवला आहे.

हे ही वाचा : 

लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या?, सलमान खानच्या वडिलांना महिलेकडून धमकी !

लेबनॉन स्फोटातील उपकरणे जपानी कंपनीची; उत्पादने २०१४ मध्येचं बंद केल्याचा कंपनीचा दावा

वायएसआर काँग्रेस सरकारच्या काळात, तिरुपती मंदिराच्या लाडू प्रसादात जनावरांच्या चरबीचा वापर ?

लेबनॉन पुन्हा स्फोटांनी हादरलं; पेजर्सनंतर आता रेडिओ, वॉकीटॉकीमध्ये स्फोट

या व्हिडिओमध्ये तंदूरी रोटी बनवणारा आलम हा रोट्यांवर थुंकताना दिसत आहेत. या व्हिडिओनंतर कारागिरावर कारवाईची मागणी होऊ लागली. यानंतर नोएडा पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी आलमवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. अशा मानसिकतेवर त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. पोलिसांनी सध्या हॉटेल बंद केले आहे. वकील शाही चिकन कॉर्नर नावाचा हा ढाबा दशकाहून अधिक काळापासून दनकौर परिसरातील बिहारीलाल चौकात सुरु होता.

 

Exit mobile version