एका ४५ ते ५० वर्षाच्या व्यक्तीची हत्या करून त्याचे हात, पाय आणि धड प्लॅस्टिकमध्ये बांधून ते सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालायामागे फेकल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (३० सप्टेंबर) अँटॉप हिल परिसरात उघडकीस आली. या मृतदेहाचे मुंडके गायब असल्यामुळे त्याची ओळख पटवणे पोलिसांसमोर आव्हान आहे. तसेच मुंडके गायब असल्यामुळे हत्येचा तपास करण्यासही पोलिसांना अडचण होणार आहे. याप्रकरणी अनोळखी व्यक्ती विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
गुरुवारी सकळी स्थानिकांकडून या मृतदेहाविषयी पोलिसांना समजले. प्लॅस्टिकच्या आजूबाजूला असणाऱ्या रक्ताच्या डागामुळे स्थानिकांनी लगेचच अँटॉप हिल पोलिसांना याबद्दल माहिती दिली. संबंधित प्रकरणाची माहिती मिळताच अँटॉप हिल पोलिसांनी आणि गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. सीजीएस कॉलनीतील सेक्टर ७ मधील इमारत क्रमांक ९९ च्या पाठीमागे हा मृतदेह आढळला. इमारतीमध्ये सायन विभागाच्या सहाय्यक आयुक्तांचे कार्यालय आहे. परिसरालगत सरकारी आणि वसाहती आणि मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या आहेत.
हे ही वाचा:
रिओ ऑलिम्पिकमधील बॉक्सिंग स्पर्धांत झाला होता हा घोळ…
गुलाब चक्रीवादळामुळे झाली ३५ लाख हेक्टर शेती उद्ध्वस्त
तुम्ही संपूर्ण शहराला बंदिस्त केले आहे
आरोग्य विभाग परीक्षेचे काम ‘त्या’ न्यासाकडेच! परीक्षेनंतर म्हणे दंड ठोठावणार
प्लॅस्टिकमध्ये ४५ ते ५० वयाच्या व्यक्तीच्या शरीराचे तुकडे करून हात, पाय आणि धड एका चादरीत गुंडाळून त्यानंतर ते प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून फेकून देण्यात आले आहे. आरोपीने मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, तो पूर्णपणे जळला नसल्याचे मृतदेहावरून समजून आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस सध्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाच्या माध्यमातून तपास करत असून परीसारतील गायब असलेल्या व्यक्तींचाही शोध घेत आहेत. मृतदेहाचे मुंडके शोधण्यासाठी पोलिसांनी आसपासचा संपूर्ण परिसर पिंजून काढला आहे. मात्र हाती काहीही लागले नाही. मृतदेहाजवळ मिळालेली चादर आणि प्लॅस्टिकच्या मदतीने काही धागा हाती लागतो का? याचा तपास पोलीस करत आहेत. मृतदेहाचे मुंडके नसल्यामुळे मृताची ओळख पटविण्यास अडचण येत असून याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू आहे, असे परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त विजय पाटील यांनी सांगितले.