शंभर कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणामध्ये तुरुंगात असलेल्या बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्या अडचणींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मुंबई येथील विशेष न्यायालयाने बडतर्फ सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याचा माफीचा साक्षीदार होण्याचा अर्ज फेटाळला आहे. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सुरू असलेल्या मनी लॉड्रिंगच्या खटल्यामध्ये माफीचा साक्षीदार होण्यासाठी वाझे याने विशेष न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
न्यायालयाने म्हटले आहे की, “या प्रकरणात पीएमएलएच्या तरतुदीनुसार तपास संस्थांनी गोळा केलेले पुरावे अर्जदार, तसेच आरोपी यांच्या अनुषंगाने पुरेसे आहेत.” सचिन वाझे याने या प्रकरणाची संपूर्ण माहिती देण्याची आणि त्याबदल्यात माफी मिळावी म्हणून माफीचा साक्षीदार होण्याचा अर्ज केला होता. सचिन वाझे याने सीबीआयकडे यापूर्वी माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज केला होता. सीबीआयने हा अर्ज मंजुर केला, सीबीआयच्या विशेष न्यायालयाने माफी दिलेली आहे.
विशेष न्यायाधीश अदिती कदम म्हणाल्या की, “सचिन वाझे याच्या अर्जात कोणतेही गुणवत्ता नाही, त्यामुळे ती फेटाळली जात आहे. Code of Criminal Procedure (CrPC) Section 306 नुसार माफी दिली जाते. पण अनेक व्यक्तींनी मिळून गुन्हा केला असेल आणि माफी मिळालेल्या व्यक्तीच्या मदतीने संबंधित खटल्याचा योग्य निवडा होऊ शकतो, अशी स्थिती असेल तर ही माफी मिळू शकते. पुराव्याअभावी दोषी सुटून जाऊ नयेत, यासाठी ही तरतुद आहे.” ईडीने वाझे याच्या अर्जाला विरोध दर्शवला आहे. गोळा केलेले पुरावे लक्षात घेता वाझेला माफी देण्याची गरज नाही, असे ईडीने म्हटले आहे.
हे ही वाचा :
जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांनंतर लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त शोध मोहिमेला वेग
ठाकरे गटानंतर काँग्रेसचीही दुसरी यादी जाहीर; एकूण ७१ जागांवर दिले उमेदवार
पूर्व लडाखमधील डेपसांग आणि डेमचोकमध्ये लष्करी संरचना हटवण्यास सुरुवात
माविआमधील जागवाटपाच्या धुसपुशीत ठाकरे गटाचे ८० उमेदवार जाहीर, ६५ नंतर आणखी १५ घोषित
काही दिवसांपूर्वीचं सचिन वाझेला वसुली प्रकरणामध्ये जामीन मंजूर झाला करण्यात आला आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अन्य आरोपी जामिनावर बाहेर आहेत, त्यामुळे सचिन वाझे यानेही जामिनासाठी याचिका केली होती. वाझे याच्यावर उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाच्या बाहेर जिलेटिनच्या कांड्या ठेवल्याचा आणि धमकीचा आरोप आहे. तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि १०० कोटींच्या खंडणी प्रकरणातही तो आरोपी आहे.