30 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरक्राईमनामालोन ऍप्लिकेशन छळवणूक प्रकरणाचे कर्तेधर्ते नेपाळमध्ये

लोन ऍप्लिकेशन छळवणूक प्रकरणाचे कर्तेधर्ते नेपाळमध्ये

Google News Follow

Related

कथित लोन ऍप्लिकेशन प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. लोन ऍप्लिकेशनवरून ऑनलाइन फसवणूक व छळवणूक करण्यात येत आहे, त्याचे कर्तेधर्ते नेपाळ या राष्ट्रात बसून भारतीयांची फसवणूक करीत असल्याचा धक्कादायक खुलासा कुरार आत्महत्येप्रकरणी राजस्थान मधून अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या चौकशीत समोर आला आहे. नेपाळ मधून राजस्थान, पश्चिम बंगाल, ढाका येथील तरुणांना खास प्रशिक्षण देऊन त्यांच्या मार्फत हा सर्व प्रकार सुरू आहे.

लोन ऍप्लिकेशनच्या छळाला कंटाळून मालाड पूर्व कुरार व्हिलेज येथील संदीप कोरगावकर या तरुणाने आत्महत्या केली होती. याप्रकरणी मुंबई सायबर गुन्हे शाखेच्या उत्तर विभागाने राजस्थान येथून राजू खडवा याला अटक केली आहे. राजू खडवा यानेच संदीप कोरगावकर याला बदनाम करण्याची धमकी देऊन त्याचे फोटो मॉर्फ करून सोशल मीडियावर व्हायरल केले असल्याचे उघडकीस आले आहे.

इंटरनेट प्रोटोकॉल डिटेल रेकॉर्ड वापरून पोलिसांनी खडावचा शोध घेतला आणि त्याने चार वेगवेगळे मोबाईल फोन आणि चार सिमकार्ड वापरल्याचे चौकशीत समजले. व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्किंग (व्हीपीएन) वापरून त्याने आपली ओळख लपवली होती. तो इंटरनेटसाठी एक मोबाइल फोन वापरत होता आणि दुसरा कॉल करण्यासाठी वापरत असलेले फोन हॉटस्पॉटद्वारे इंटरनेटशी जोडलेले होते. राजू खडावा याचे हँडलर्स नेपाळ राष्ट्रात असून त्यांच्या मार्फत राजू आणि इतरांना इंटरनेट च्या माध्यामातून प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती समोर आली.

हँडलर्सनी त्याला कर्ज वसुलीसाठी कॉल करण्याचे प्रशिक्षण दिले, असे एका अधिकाऱ्यांनी सांगितले. “हे कॉल व्हॉट्सऍपच्या माध्यमातून करण्यात आले होते. त्याने सर्व कॉल लॉग डिलीट केले होते. त्याच्याकडे सापडलेल्या फोन नंबरपैकी एक कोरेगावकरांना कॉल करण्यासाठी वापरला होता,”अशी माहिती समोर आली. खडावा या भरघोस पगार देण्यात आला, वेगवेगळ्या बँक खाती आणि UPI आयडीद्वारे पैसे ट्रान्सफर केले गेले. “आम्हाला त्याच्या खात्यात १४ लाखांहून अधिक रक्कम सापडली आहे, ती रक्कम त्याने या माध्यमातून कमावली असल्याचा संशय आहे, कारण राजू हा एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. त्याच्या खात्यात एवढी मोठी रक्कम सापडली याबद्दल त्याच्याकडे स्पष्टीकरण देखील नाही,” असेही अधिकाऱ्याने सांगितले.

हे ही वाचा:

उत्तराखंड पोटनिवडणूकीत पुष्कर धामी यांनी रचला इतिहास

‘ज्वलंत हिंदुत्वाचे प्रवक्ते औरंगजेबाच्या कबरीवर डोके टेकवणाऱ्या टिकैत यांचा निषेध करतील का?’

‘जनतेला दिलासा फुटकळ बाब; मंत्र्यांना नव्या गाड्या, बंगले महत्त्वाचं’

राहुल गांधींना ईडीचे पुन्हा समन्स

त्या व्यतिरिक्त, “तांत्रिक विश्लेषणाद्वारे आणखी दोन संशयितांची माहिती मिळाली असून ते नेपाळमधून कार्यरत आहेत. नोडल एजन्सी असलेल्या सीबीआय मार्फत इंटरपोलची मदत घेण्याच्या प्रक्रियेत आहोत,” अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.खडाव आज (शुक्रवार) सायबर सेलच्या ताब्यात आहे. हँडलर आणि त्यांची कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी पोलीस त्याच्या पुढील कोठडीची मागणी करणार आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा