ऑनलाइन गेमिंग ऍप प्रकरणातील आरोपी मुंबईजवळ बांधणार होता पंचतारांकित हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स

भोपाळमध्ये कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केली

ऑनलाइन गेमिंग ऍप प्रकरणातील आरोपी मुंबईजवळ बांधणार होता पंचतारांकित हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स

महादेव ऑनलाइन गेमिंग ऍप प्रकरणी अनेक बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारवर असताना या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. महादेव गेमिंग ऍप प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ चंद्राकर हा मुंबईजवळ पंचतारांकित हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स बांधण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, सट्टेबाजीत कमावलेल्या पैशांनी सौरभ चंद्राकर याने मध्यप्रदेशात कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केली होती.

माहितीनुसार, आरोपींनी भोपाळमध्ये कोट्यवधींची मालमत्ता खरेदी करण्यासाठी या पैशाचा वापर केला आहे. तसेच या मालमत्ता इतरांच्या नावे खरेदी केल्याचे समोर आले आहे. ईडीकडून याचा तपास सुरू आहे. शिवाय सौरभ हा मुंबईतील एका प्रख्यात ब्रोकरच्या संपर्कात होता. मुंबई शहराजवळील मोक्याच्या जागा शोधण्यासाठी तो संपर्कात असल्याचे समोर आले आहे. मुंबईजवळ पंचतारांकित हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स बांधण्याची त्याची योजना होती.

ईडी आता महादेव ऍप प्रकरणी चंद्राकरच्या मालमत्तेसह त्यांची कागदपत्र आणि त्यांच्या खरेदी, विक्रीशी संबंधित माहिती गोळा करत आहे. कोट्यवधी रुपयांच्या गुन्ह्यातील पैसे कुठे गुंतवले गेले आणि कोणाकडे गेले, यासंदर्भात माहिती मिळू शकेल. या प्रकरणी ईडी सातत्याने छापेमारी करत आहे. तसेच, याप्रकरणी अनेकांची चौकशीही करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

इस्रायलच्या लष्कराने हमासच्या ताब्यातून केली २५० ओलिसांची सुटका

‘हमासला पृथ्वीवरून नामशेष करू’!

मुंबई पोलीस दलात तीन हजार कंत्राटी पोलीस भरतीला सुरुवात!

खलिस्तानी समर्थक दहशतवाद्यांना घरी ठेवणाऱ्याला कॅनडाचा आश्रय

या संदर्भात ईडीनं अनेक बॉलिवूड कलाकारांना समन्स बजावलं आहे. तसेच त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यासही सांगितले आहे. बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकार ईडीच्या रडारवर आहेत. महादेव ऑनलाईन बेटींग ऍपशी सबंधित ईडीकडून मुंबईसह विविध राज्यात ३९ ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. या छापेमारीमध्ये ईडीने ४१७ कोटी रुपयांपेक्षा अधिक मालमत्ता जप्त केली आहे. महादेव ऑनलाईन बेटींग ऍपच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याचा ईडीला संशय होता. याप्रकरणी मनी लाँन्ड्रींगचा गुन्हा दाखल करत ईडीने चौकशी सुरु केली आहे.

Exit mobile version