31 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरक्राईमनामाजयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस गोळीबार प्रकरणातील आरोपीने महिलेलाही दिली होती धमकी

जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस गोळीबार प्रकरणातील आरोपीने महिलेलाही दिली होती धमकी

रायफलचा धाक दाखवून ‘जय माता दी’ म्हणण्यास पाडले भाग

Google News Follow

Related

पश्चिम रेल्वेवरील जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये गोळीबार करून आरपीएफ अधिकाऱ्यासह चौघांची हत्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी जवान चेतनसिंह बच्चुसिंह चौधरी (वय ३३वर्षे) याने एका मुस्लीम महिलेला रायफलचा धाक दाखवून ‘जय माता दी’ म्हणण्यास भाग पाडले होते. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली होती, अशी माहिती ‘लोकसत्ता’ने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

जयपूर एक्स्प्रेसच्या ‘बी ३’ डब्यात हा प्रकार घडला असून रेल्वेमधील सीसीटीव्ही कॅमेरात हा संपूर्ण प्रकर चित्रित झाला आहे. आरोपी चेतनसिंहने ३१ जुलै रोजी रायफलचा धाक दाखवून एका महिलेला थांबवले आणि ‘जय माता दी’ म्हणण्यास सांगितले. घाबरलेली महिला ‘जय माता दी’ म्हणाली. पण त्यावर त्याचे समाधान झाले नाही म्हणून पुन्हा तिला मोठ्या आवाजात ‘जय माता दी’ म्हणण्यास सांगितले. त्यावेळी महिलेने त्याची रायफल बाजूला करून ‘तू कोण आहेस?’ असे विचारले. रायफल बाजूला केल्यामुळे चेतनसिंह संतापला आणि त्याने रायफलला पुन्हा हात लावल्यास गोळ्या घालेन, अशी महिलेला धमकी दिली.

सीसीटीव्हीच्या मदतीने रेल्वे पोलिसांनी या महिला प्रवाशाची ओळख पटवून तिचा जबाब नोंदवला आहे. याप्रकरणी महिलेला साक्षीदार करण्यात आले आहे. याप्रकरणी चेतनसिंहविरोधात भादंवि १५३ (अ) अंतर्गत धार्मिक द्वेष निर्माण केल्याप्रकरणी कलम वाढवण्यात आले होते. महिलेची साक्ष धार्मिक द्वेष निर्माण केल्याबाबत आरोप सिद्ध करण्यात महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

हे ही वाचा:

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची राम कथेला हजेरी

शिमल्यामध्ये जोशीमठसारखी परिस्थिती; घरांना भेगा

चाचणी न देताच संघात आलेल्या विनेशची आशियाई स्पर्धेतून माघार

केंद्र सरकारने ठरवले टॉमेटो विकायचे ५० रुपये किलो दराने!

चेतनसिंहने असगर याच्या मृतदेहाच्या शेजारी उभे राहून धार्मिक द्वेष पसरवणारे भाष्य केलेली ध्वनिचित्रफीत व्हायरल झाली होती. यासंदर्भातील ध्वनिचित्रफित समाजमाध्यमावर प्रसारित झाली होती. या ध्वनिचित्रफीतीच्या सत्यतेबाबत तसेच त्यातील आवाज आरोपी चेतनसिंह याचाच असल्याची पडताळणी करण्यात आली आहे. त्यासाठी चेतनसिंहच्या आवाजाचे नमुने, छायाचित्रे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आली होती. जयपूर- मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये चार प्रवाशांवर गोळ्या झाडून हत्या करणारा आरोपी चेतनसिंह बोरिवली रेल्वे पोलिसांच्या अटकेत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा