पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्याच्या साथीदारास रत्नागिरीतून अटक

एटीएसकडून मोठी कारवाई

पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्याच्या साथीदारास रत्नागिरीतून अटक

पुण्याच्या कोथरूडमध्ये अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याच्या एका साथीदारास दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) रत्नागिरी जिल्ह्यातून अटक केली आहे. त्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

दुचाकी चोरण्याचा तयारीत असलेल्या इम्रान युनूस खान आणि युनूस याकूब साकी, दोघेही रा. रतलाम, मध्यप्रदेश, सध्या कोंढवा यांना गेल्या आठवड्यात एटीएसने अटक केली होती. प्राथमिक तपासात हे दोघेही फरारी दहशतवादी असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर पोलिसांनी जी माहिती मिळाली त्यावरून या दोघांना आश्रय देणाऱ्या मूळचा गोंदिया आणि सध्या कोंढवा परिसरात वास्तव्यास असलेल्या अब्दुल कादिर दस्तगीर यालाही पोलिसांनी अटक केली होती.

या तिघांची चौकशी सुरु असताना रत्नागिरीमधील एकाने आर्थिक रसद पुरवली असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्याची चौकशीसाठी सुरु असताना त्यात त्याने आर्थिक रसद पुरवली असल्याचे स्पष्ट झाले.

हे ही वाचा:

राज्यात प्रथमच महसूल सप्ताहाचे आयोजन

भारतीय शास्त्रज्ञांकडून हिमालयातील प्राचीन महासागराचा शोध

राज्यात सॅटेलाईट कॅम्पसमुळे स्थानिक पातळीवर रोजगार मिळतील

नाशिक महामार्गाच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

दरम्यान, दहशतवाद्यांकडून पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यातील जंगलात बॉम्बस्फोटाचा सराव करण्यात आला असल्याची धक्कादायक माहितीही आता समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे संशयित आरोपी पुण्यात राहत होते आणि पुण्यातील पाणशेत धरणाच्या जंगल परिसरात, साताऱ्यातील जंगल परिसरात आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आंबोली घाट परिसरातील जंगलात सुद्धा बॉम्बस्फोटाचा सराव केला असल्याची माहिती समोर आली आहे.

Exit mobile version