28 C
Mumbai
Wednesday, November 6, 2024
घरक्राईमनामा'त्या' जोडप्याचा भांग पिऊन बाथरुममध्ये झाला मृत्यू

‘त्या’ जोडप्याचा भांग पिऊन बाथरुममध्ये झाला मृत्यू

घाटकोपरच्या दाम्पत्याच्या तपासात वेगळे वळण

Google News Follow

Related

घाटकोपरच्या उच्चभ्रू सोसायटी मध्ये झालेल्या दाम्पत्याच्या मृत्यूच्या तपासात आता वेगळे वळण आले आहे. या दाम्पत्याचा मृत्यू हा गिझरच्या गॅस गळती मुळे न होता भांग प्यायल्याने झाल्याचा पोलिसांचा संशय असून या संदर्भात घाटकोपर पंतनगर स्थानकाचे पोलीस याचा तपास करत आहेत. धुलीवंदनाच्या दिवशी मंगळवारी दीपक शाह आणि टिना शाह हे दाम्पत्य आपल्या मित्रांसोबत रंग खेळून येऊन आपल्या बाथरूम मध्ये मृतावस्थेत आढळले होते. शाह दाम्पत्य हे घरापासून दोनशे मीटर अंतरावर साडेतीनच्या सुमारास छेडा नगर जंकशनवर दिसले होते. मात्र त्यानंतर रात्री साडेनऊ पर्यंत त्यांचा काहीच पत्ता नव्हता.

काल पोलिसांनी आणि डॉक्टरांनी हे भांग आणि अल्कोहोलसारखे विषबाधीचे कारण असू शकते का? हि शक्यता पडताळत होते. या दाम्पत्याचे काही महत्वाचे अवयव तपासणीला पाठवण्यात आले असून सध्या त्या अहवालाची प्रतीक्षा आहे. पोटामधील रासायनिक पदार्थ हे घटनास्थळी सापडलेल्या उलटीच्या खुणा याशिवाय इमारतीतील सीसीसीटीव्ही फुटेज यांचा सुद्धा तपास सुरु आहे. या सर्व गोष्टींचा सध्या तपास सुरु असून त्यातून उपयुक्त माहिती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दीपक शाह आणि टिना शाह हे अनुक्रमे ४४ आणि ३८ वर्षीय दाम्पत्य घरच्या बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळून आले होते. त्यांच्या शरीराच्या बाजूला उलट्या आणि गिझरचे पाणी गळत होते  असे आढळले. पोलिसांच्या माहितीनुसार दोघेही घरी आल्यावरच लगेच मृत्युमुखी पडले होते. एका दिवसानंतर त्यांचे मृतदेह आढळून आले. त्याच्या शरीरावर शॉवरमधून पाण्याचा सतत प्रवाह सुमारे २० तास सुरु राहिल्यामुळे त्यांची त्वचासुद्धा सैल पडली होती.

हे ही वाचा:

सदानंद कदम ईडीच्या ताब्यात.. लवकरच न्यायालयात हजर करणार

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ‘टॉप’

तेजस्वी यादव, लालू यादवांच्या मुलींच्या घरातून मिळाली रोकड, २ किलो सोने

मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा धाड; समर्थकाने डोके फोडून घेतले

दरम्यान , दीपक शाह यांचे हे दुसरे लग्न होते असे एका अधिकाऱ्याने सांगितले. दोनच वर्षपूर्वी त्यांनी दुसरे लग्न केले होते त्यांना दोन मुले देखील आहेत. त्याच्या पहिल्या पत्नीला चौकशीसाठी बोलावण्यात आले असून मागील तीन महिन्यांमध्ये त्यांना दोघांनाही आलेल्या सुमारे ४५०० कॉल्सवरून पोलीस नावांची यादी करत आहेत. प्राथमिक निरीक्षणावरून पोलिसांना त्यांचा मृत्यू हा गिझरमधील गॅस गळतीमुळे असल्याचा संशय होता. पण गिझर बंद असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याची माहिती पंत नगर पोलीस स्थानकातील अधिकाऱ्यांना  दिली आहे. गुरुवारी या दाम्पत्याच्या मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. सध्या डॉक्टरांनी दोघांच्या मृत्यूचे कोणतेच प्राथमिक कारण दिलेले नाही. कलीना फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पुढील व्हिसेरा आणि आवश्यक पडताळणी करण्यात आली असून विश्लेषण करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा