एटीएसने ठाण्यातून अटक केलेल्या गौरव पाटील याच्या मोबाईल फोनमध्ये ९०० चॅट समोर आले आहे. या चॅट दरम्यान त्याने पाकिस्तानस्थित गुप्तहेरांना अतिशय संवेदनशील माहिती पुरवल्याचे उघड झाले आहे.
पायल एंजल आणि आरती शर्मा या नावाने पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्यानी गौरव पाटील याला हनीट्रॅप मध्ये अडकवून त्याच्या कडून महत्वाची भारतीय नौसेना मधील संवेदनशील माहिती काढून घेत होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव, नोव्हेंबर २०२२ मध्ये नौदल डॉकयार्डमध्ये प्रशिक्षणार्थी सिव्हिल अप्रेंटिस म्हणून नियुक्त झाला होता आणि मे २०२३ ते ऑक्टोबर २०२३ दरम्यान तो पायल एंजल आणि आरती शर्मा या नावाने फेसबुक खाते असलेल्या पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह (पीआयओ) या गुप्तहेराच्या संपर्कात होता.
हे ही वाचा:
संसद घुसखोरी प्रकरणातील मास्टरमाईंड ललित झा शरण
धर्मांतरित व्यक्तींना आदिवासींचे लाभ नको ! विधान परिषदेत मागणी
४७ वर्षांचा अभिनेता श्रेयस तळपदे याला हृदयविकाराचा झटका
संसदेत गोंधळ घातल्या प्रकरणी एक राज्यसभा आणि १४ लोकसभा खासदार निलंबित!
गौरवने वैयक्तिक खर्चासाठी काही पैशांची गरज व्यक्त केल्यावर त्याला केवळ २ हजार रुपये मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरवने पश्चिम बंगालमधील मुक्ता महतो बँकेच्या एका खात्यातून जी-पेद्वारे पैसे मिळवले होते, परंतु तपास यंत्रेनला संशय आहे की बँक खाते बनावट कागदपत्रांसह उघडले असल्याची शक्यता आहे, याबाबत तपास सुरू आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फेसबुकवर पायल एंजेल म्हणून स्वत:ची ओळख करून देणाऱ्या पीआयओ एजंटच्या हनी ट्रॅपमध्ये गौरव अडकला होता, गौरवला टार्गेट करण्यासाठी पीआयओ गुप्तहेरानी त्याच्याबाबत अधिक माहिती मिळवली होती.
गौरवाने स्वतःची ओळख नौदल शिपयार्डचा कर्मचारी म्हणून दिली होती.पीआयओ गुप्तहेरांनी मुलीच्या नावाचा वापर करून त्यांना नौदल, जहाजे आणि युद्धनौकांमध्ये उत्सुकता असल्याचे चॅटिंग दरम्यान म्हटले होते.गौरव याने युद्धनौका आणि पाणबुड्यांची काही छायाचित्रे त्यांना शेअर केली असल्याचे समजते. गौरव पाटीलने नौदलाच्या युद्धनौकांविषयी महत्त्वाची माहिती शेअर केल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे.