देशाच्या विविध भागात स्फोट घडवण्याची होती दहशतवाद्याची योजना

धक्कादायक खुलासा आला समोर

देशाच्या विविध भागात स्फोट घडवण्याची होती दहशतवाद्याची योजना

पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) अल कायदाच्या दहशतवाद्याला अटक केली आहे. या अटक केलेल्या दहशतवाद्याच्या चौकशीत एक धक्कादायक खुलासा झाला आहे. हा दहशतवादी केवळ पश्चिम बंगालमध्येच नव्हे तर देशाच्या विविध भागात स्फोट घडवण्याची योजना आखत होता असे त्याने माहितीमध्ये सांगितले आहे.

एसटीएफकडून मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी मोहम्मद हसनतच्या चौकशीत याची पुष्टी झाली आहे. मालदा येथे त्याचे निवासस्थान आहे जिथून पेन ड्राइव्ह सापडला आहे. यामध्ये या दहशतवाद्यांनी ‘लोन वुल्फ अटॅक’ची योजना आखली होती. त्यांच्याकडून एक पेन ड्राईव्ह जप्त करण्यात आला असून, यादरम्यान त्यांनी केवळ पश्चिम बंगालमध्येच नव्हे तर देशाच्या विविध भागात स्फोटाची योजना आखली होती. दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सोडून बांगलादेशात पळून जाण्याची योजनाही त्याने आखली होती. तेथेही तो बांगलादेशातील दहशतवाद्यांच्या सतत संपर्कात होता.

हे ही वाचा:

संभाजी भिडेंनी पत्रकाराला सांगितले, आधी टिकली लाव मगचं बोलू

मुंबईत एका मुलीचे फुटपाथवरून अपहरण, दोन महिला अटकेत

राज्यातील बँकिंग घोटाळ्यांची होणार चौकशी

भारताने बांगलादेशला नमवले आणि पाकिस्तानची केली कोंडी

अलीकडेच राज्य पोलिस आणि कोलकाता पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने मिळून चार दहशतवाद्यांना अटक केली. त्यांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये केवळ दहशतवादी कारवाया करण्याची योजना आखली नव्हती तर डझनाहून अधिक उच्चभ्रू नेत्यांनाही लक्ष्य केले होते, अशी माहिती मिळाली आहे. त्यांची नावे सांकेतिक भाषेत लिहिली आहेत जी डीकोड करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचे इतर अनेक साथीदार मध्य प्रदेशातील भोपाळ येथे लपून बसले आहेत, ज्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली आहे. याप्रकरणी आणखी अटक करून चौकशी सुरू आहे.

Exit mobile version