26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामादहशतवाद्यांनी २० मिनिटे गोळीबार केला आणि.... जखमी यात्रेकरुंनी सांगितलं नेमकं काय घडलं?

दहशतवाद्यांनी २० मिनिटे गोळीबार केला आणि…. जखमी यात्रेकरुंनी सांगितलं नेमकं काय घडलं?

हल्ल्यात १० जणांचा मृत्यू तर ३० हून अधिक जण जखमी

Google News Follow

Related

जम्मू-काश्मीरमधील रियासीमध्ये यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी रविवार, ९ जून रोजी हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान बस दरीत कोसळली. या हल्ल्यात आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांनी पहिले बसवर अंदाधुंद गोळीबार केला. यात बस चालकाला गोळी लागली त्यामुळे त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस बाजूच्या खड्ड्यात पडली. या हल्ल्यात ३० हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

यात्रेकरूंनी भरलेली बस शिवखोडीहून कटरा येथे जात असताना बसवर दहशतवादी हल्ला झाला, त्यानंतर संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून यातून वाचलेल्या भाविकांनी या हल्ल्याबद्दल सांगितले आहे. दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेले उत्तर प्रदेशमधील बलरामपूरचे रहिवासी संतोष कुमार वर्मा यांनी सांगितलं की, शिवखोडीला भेट दिल्यानंतर आम्ही कटराकडे जात होतो. बसचा प्रवास सुरू असतंच असतानाच एका दहशतवाद्याने रस्त्याच्या मधोमध गोळीबार सुरू केला. चालकाला गोळी लागल्याने बस खड्ड्यात गेली. दहशतवाद्यांनी तेव्हा सुमारे २० मिनिटे गोळीबार केला. पाच- सहा वेळा गोळीबार केल्यानंतर ते थांबायचे आणि पाच मिनिटांनी पुन्हा गोळीबार सुरू करायचे, असं वर्मा यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशच्या गोंडा येथील रहिवासी नीलम गुप्ता यांनी सांगितले की, आम्ही शिवखोडीला भेट देऊन येत असताना दहशतवाद्यांनी बसवर गोळीबार केला. गोळी बसचालकाला लागल्यामुळे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस खड्ड्यात पडली. मात्र, तेथे एकूण किती दहशतवादी होते याची माहिती नाही. बस कोसळल्यानंतर आम्हाला दहशतवादी दिसत नव्हते. बसमध्ये लहान मुलांसह ४० लोक होते. अनेक जण जखमी झाले होते.

नीलम गुप्ता यांचा मुलगा पल्लव याने सांगितले की, आम्ही बसमध्ये होतो आणि कोणी गोळीबार केला हे आम्हाला माहित नाही. आवाज कमी झाल्यावर आम्ही सगळे बसमधून खाली उतरलो. आम्ही खड्ड्यात पडलो होतो. मला माझ्या बाबांनी मला बाहेर काढले. एका यात्रेकरूने सांगितले की, तेथे सहा ते सात दहशतवादी होते, त्यांचे चेहरे झाकलेले होते. सुरुवातीला त्यांनी रस्त्यावर बसला घेरले आणि गोळीबार केला, बस खाली खड्ड्यात पडल्यावर ते बसच्या दिशेने खाली आले आणि सर्व लोक मारले गेले याची खात्री करण्यासाठी गोळीबार करत राहिले. आम्ही शांत पडून राहीलो.

केंद्रीय मंत्री अमित शाह या घटनेबद्दल म्हणाले की, यात्रेकरूंवरील क्रूर दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्यांना सोडले जाणार नाही. रविवारी दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर लगेचच अमित शाह यांनी जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा आणि जम्मू आणि काश्मीरचे डीजीपी आरआर स्वेन यांच्याशी चर्चा केली. तसेच त्यांनी दहशतवादी हल्ल्यानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेतला.

हे ही वाचा:

रशियाच्या लढाऊ विमानाला युक्रेनने केले लक्ष्य!

टेस्लाच्या एआय यंत्रणेत भारतीय वंशाच्या इंजिनियरचे योगदान!

ओडिशातील भाजपचे पहिले सरकार १०जूनऐवजी १२ जून रोजी शपथ घेणार!

‘पुन्हा भाजपचा जयजयकार केल्यास जमिनीत गाडून टाकू’

रियासी एसएसपी मोहिता शर्मा यांनी सांगितले की, ही एक दुर्दैवी घटना असून प्राथमिक अहवालानुसार, दहशतवाद्यांनी बसवर हल्ला केला आणि गोळीबार केला. बस कटरा येथून शिवखोडीकडे निघाली होती गोळीबार झाला. बचाव कार्य पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र हे सर्वजण उत्तर प्रदेशातील असल्याचे प्राथमिक अहवालातून स्पष्ट झाले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा