दहशतवादी मुझफ्फर, फैसल यांना फाशीची शिक्षा

विशेष न्यायालयाने सुनावली शिक्षा

दहशतवादी मुझफ्फर, फैसल यांना फाशीची शिक्षा

राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयए आणि उत्तर प्रदेश एटीएसच्या विशेष न्यायालयाने ठाकूरगंजमध्ये एटीएसमध्ये मारला गेलेला दहशतवादी सैफुल्लाचे साथीदार मुझफ्फर आणि फैसल यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. दोषींना शिक्षा सुनावताना न्यायालयाने सांगितले की, उच्च न्यायालयाच्या पुष्टीनंतर त्यांना फाशी दिली जाईल.

न्यायालयाने यावेळी दोषींना ११ लाख ७० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. ही दंडाची रक्कम मृत रमेश बाबूच्या नातेवाईकांना देण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा दंडाधिकारी लखनऊ यांना रमेश बाबू शुक्ला यांच्या कुटुंबीयांची ओळख पटवून देण्याचे आदेश देण्यात आले जेणेकरून त्यांना नुकसान भरपाईची रक्कम देता येईल.

न्यायालयात एनआयएचे विशेष सरकारी वकील एम के सिंग, के के शर्मा आणि ब्रिजेश कुमार यादव यांनी सांगितले की, या प्रकरणाचा अहवाल फिर्यादी अक्षय शुक्ला यांनी २४ ऑक्टोबर २०१६ रोजी कानपूरमधील चकेरी पोलीस ठाण्यात दाखल केला होता. सैफुल्ला, आतिफ आणि फैसल विरोधात कानपूरमध्ये तक्रार दाखल केली. चकेरी येथे सेवानिवृत्त शिक्षक रमेश बाबू शुक्ला यांच्या हातात धागा (कलाव) दिसल्यानंतर आणि त्यांची हिंदू ओळख पटवून दिल्यानंतर रमेश बाबू यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

हे ही वाचा:

जो बायडेन यांच्या मुलाला ड्रग्जचे व्यसन, बंदूक बाळगण्याचा आरोप

पाकिस्तानचा खेळ संपला; श्रीलंका अंतिम फेरीत

आधी ‘गदर २’ पाहा तरी…दिग्दर्शकाचा नसिरुद्दीन शहा यांना सल्ला

मराठा समाजाला एकनाथ शिंदे न्याय देऊ शकतात!

विशेष न्यायाधीशांनी १० सप्टेंबर २०१८ रोजी आरोपी आतिफ मुझफ्फर आणि मोहम्मद फैसल यांच्यावर आरोप निश्चित केले होते. २८ फेब्रुवारी रोजी एनआयए कोर्टाने याआधीच दोन्ही आरोपींना दुसऱ्या एका प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावली होती. भोपाळ उज्जैन पॅसेंजर ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणातील दोन्ही दोषी आरोपी असून भोपाळ न्यायालयात हा खटला सुरू आहे.

Exit mobile version