जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांचा मजुरांवर अंदाधुंद गोळीबार

जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांचा मजुरांवर अंदाधुंद गोळीबार

जम्मू काश्मीरमध्ये अतिरेकी गेल्या काही दिवसांपासून सरकारी अधिकाऱ्यांना लक्ष्य करत आहेत. आता या अतिरेक्यांनी उदरनिर्वाहासाठी जम्मू-काश्मिरमध्ये आलेल्या परप्रांतीय मजुरांना लक्ष्य केले आहे. शनिवारी अतिरेक्यांनी परप्रांतीय मजुरांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात दोन मजूर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यानंतर सुरक्षा दलांनी घटनेचा संपूर्ण परिसर सील केला आहे.

जम्मू-काश्मिरमधील अनंतनाग जिल्ह्यातील राख-मोमिन परिसरातील प्रसाद आणि गोविंद यांच्यावर अतिरेक्यांनी गोळीबार केला. दोघंही उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. स्थानिकांना ही घटना समजताच त्यांनी याबाबतची माहिती सुरक्षा दलांना दिली. त्यानंतर जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी मजुरांना उपचारासाठी अनंतनागमधील जीएमसी रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर सुरक्षा दलातील जवानांनी अतिरेक्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.

हे ही वाचा:

मुंबईसह ठाणे पोलीस दलात मोठा फेरबदल

वांगं तेच, बिरबल आणि राऊतांची मजबुरीही सारखीच….

जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर

बाबा रामदेव यांना धक्का; पतंजलीच्या पाच औषधांवर बंदी

गेल्या दहा दिवसांत दक्षिण काश्मीरमधील अन्य राज्यातील कामगारांवर झालेला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे. यापूर्वी अनंतनागमध्येच अतिरेक्यांनी दोन मजुरांवर गोळीबार केला होता. या हल्ल्यात दोन्ही कामगार जखमी होऊन जमिनीवर पडले. ते मेले असं समजून दहशतवाद्यांनी तेथून पळून काढला. मात्र, स्थानिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. हे कामगार शहरातील एका खाजगी शाळेत काम करत होते. त्यानंतर आता पुन्हा मजुरांवर हल्ला करण्यात आल्यानं परप्रांतीयांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Exit mobile version