म्यानमार सीमेवरील हल्ल्यात कमांडिंग ऑफिसरसह पत्नी आणि मुलगा ठार

म्यानमार सीमेवरील हल्ल्यात कमांडिंग ऑफिसरसह पत्नी आणि मुलगा ठार

मणिपूरमध्ये शनिवारी (१३ नोव्हेंबर) सैन्याच्या तुकडीवर हल्ला झाला. या हल्ल्यात एक ऑफिसर, चार  जावन आणि ऑफिसर यांची पत्नी आणि मुलगा ठार झाले आहेत. म्यानमार सीमेजवळील मणिपूरमधील चुराचंदपूर येथे हा हल्ला झाला आहे. ४६ आसाम रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये ठार झाले आहेत. त्यांच्यासमवेत त्यांची पत्नी, मुलगा आणि चार सैनिक देखील या हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडले आहेत. म्यानमार सीमेजवळील मणिपूरमधील चुराचंदपूर येथे हा हल्ला झाला आहे.

याबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करत या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी दहशतवाद्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

या हल्ल्यामध्ये कर्नल विप्लव त्रिपाठी, त्यांची पत्नी आणि मुलगा मारले गेले. कर्नल त्रिपाठी हे छत्तीसगडमधील रायगढ जिल्ह्याचे होते. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही.

हे ही वाचा:

चार टक्के व्याजावर पालिकेचे ‘बेस्ट’ कर्ज

मुंबई महानगरपालिकेत २५ वर्षांत ३ लाख कोटींचा भ्रष्टाचार

शाकाहाराच्या पुरस्कारामुळे महापौरांवर मांसाहारी वैतागले

‘रझा अकादमीवर बंदी घाला’

२०१५ मध्ये मणिपूरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २० जवान शहीद झाले होते, त्यानंतर लष्कराने त्यांच्या कॅम्पवर सर्जिकल स्ट्राईक केला होता. मणिपूरमध्ये ईशान्येकडील काही राज्यांप्रमाणे अनेक सशस्त्र गट आहेत. त्यामुळे चीन, म्यानमार, बांगलादेश आणि भूतानच्या सीमा असलेल्या भागात अनेक दशकांपासून लष्कर तैनात आहे.

Exit mobile version