राज्यावर घोंगावतय ड्रोन हल्ल्याचे संकट  

राज्यावर घोंगावतय ड्रोन हल्ल्याचे संकट  

राज्यावर आता दहशतवादी हल्ल्याचे सावट असल्याचे वृत्त आहे. केंद्रीय यंत्रणेच्या मार्फत सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून आता मुंबईसह राज्यातील सर्व प्रमुख शहरे अलर्टवर आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या पार्शभूमीवर हा अलर्ट यंत्रणांकडून देण्यात आला आहे. विशेष म्हणजे ड्रोनच्या माध्यमातून हा हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

प्रजासत्ताक दिन दोन आठवड्यांवर येऊन ठेपला असताना आता राज्यावर दहशतवादी हल्ला होणार असल्याचा धोका व्यक्त केला जात आहे. विशेष बाब म्हणजे यावेळी राज्यात ड्रोनच्या माध्यमातून हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केला जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणेच्या मार्फत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

डार्क नेटचा वापर करुन मुंबई आणि महाराष्ट्रात ड्रोन हल्ला घडवण्याबद्दल दहशतवादी संभाषण करत आहेत, अशी माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. महाराष्ट्राच्या सायबर विभागाने दिलेल्या अहवालानुसार दहशतवादी प्रवृत्तीच्या व्यक्ती ड्रोन हल्ले, रासायनिक हल्ले आणि सायबर हल्ल्यांबद्दल डार्क नेटवर चर्चा करत होते, अशी माहिती देण्यात आली आहे..

हे ही वाचा:

अब आया है उंट हॉटेल के अंदर!

‘मुख्यमंत्रीजी, आम्ही आमच्या आरोग्याची काळजी घेतो, तुम्ही शाळा सुरू करा’

अभिनेता सिद्धार्थने सायनापुढे मान्य केला पराभव

आज १२ आमदारांना निलंबित केले, उद्या १२० जणांना कराल!

ड्रोन हल्ल्यात २०  किमी ते ३०  किमी अंतरावरुनही निशाणा साधला जाऊ शकतो. ड्रोनला बॅकट्रॅक करणे सोपे नसते. गुन्हेगाराने मोबाईल फोन वापरला,  तर त्याच्या आयएमईआय क्रमांकावरुन शोध लावला जाऊ शकतो, परंतु केवळ ड्रोनच्या मदतीने गुन्हेगाराचा शोध लावता येत नाही. त्यामुळेच महाराष्ट्रात लवकरात लवकर ड्रोनविरोधी यंत्रणा बसवावी, अशी मागणी केली जात आहे. शिवाय डार्क नेटवरून सहजपणे ब्राउजर ट्रेस करता येत नाही.

Exit mobile version