23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामादहशतवादी यासीन भटकळ सह ११ जणांवर आरोप निश्चित, देशद्रोहाचा खटला चालणार

दहशतवादी यासीन भटकळ सह ११ जणांवर आरोप निश्चित, देशद्रोहाचा खटला चालणार

आरोपींवर खटला चालवण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत.

Google News Follow

Related

भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याचा कट रचल्याबद्दल दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचा सह-संस्थापक यासिन भटकळ याच्यासह ११आरोपींवर आरोप निश्चित केले आहेत. विशेष न्यायाधीश शैलेंद्र मलिक म्हणाले की, आरोपींवर खटला चालवण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत.
 इंडियन मुजाहिदीनच्या सदस्यांनी प्रथमदर्शनी भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याचा गुन्हेगारी कट रचला होता असे ३१ मार्च रोजी जारी केलेल्या आदेशात न्यायालयाने म्हटले आहे.भारतातील प्रमुख ठिकाणी, विशेषतः दिल्लीत बॉम्बस्फोट करून दहशतवादी संघटनेची योजना पार पाडणे हा त्यांचा उद्देश होता. एनआयएने न्यायालयाला सांगितले की, दहशतवादी कारवाया करण्यासाठी इंडियन मुजाहिदीनच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या संघटनांना हवाला माध्यमातून परदेशातून नियमितपणे पैसा मिळतो.
एजन्सीने न्यायालयाला सांगितले की, आरोपी मुस्लिम तरुणांना दहशतवादी कारवायांसाठी तयार करण्यासाठी बाबरी मशीद, गुजरात दंगल आणि मुस्लिमांवरील इतर कथित अत्याचारांची पुनरावृत्ती करत असे. तरुणांना आपल्या संघटनांमध्ये सामावून घेऊन त्यांची मने कट्टरपंथी करण्याचा कट रचत. यासीन भटकळच्या चॅटवरून सुरतमध्ये बॉम्बस्फोटाची योजना उघड झाली होती, असे न्यायालयाने म्हटले आहे.
 बॉम्बस्फोटापूर्वी मुस्लिमांना तिथून हटवण्याचा कट रचल्याचे  दिसून येते. यासीन भटकळचा केवळ एका मोठ्या कटात सहभाग नव्हता, तर आयईडी बनवण्यातही त्याचा हात होता. इंडियन मुजाहिदीनने भारताच्या विविध भागात दहशतवादी कारवाया करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नवीन सदस्यांची भरती केली. त्यासाठी स्लीपर सेलचे पाकिस्तानस्थित सहयोगींचे सहकार्य घेण्यात आले. त्यांना भारतातील प्रमुख ठिकाणी विशेषत: दिल्लीत बॉम्बस्फोटाच्या माध्यमातून दहशतवादी घटना घडवून आणायच्या होत्या.
भटकळ, अन्सारी, मोहम्मद आफताब आलम, इम्रान खान, सय्यद, ओबेद उर रहमान, असदुल्ला अख्तर, उज्जैर अहमद, मोहम्मद तहसीन अख्तर, हैदर अली आणि झिया उर रहमान यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले आहेत . मात्र, न्यायालयाने मंझर इमाम, अरिज खान आणि अब्दुल वाहिद सिद्दीबप्पा यांची निर्दोष मुक्तता केली. २०१२ मध्ये एनआयएने यासिन भटकळ, इंडियन मुजाहिदीनचा माजी सह-संस्थापक यासीन भटकळसह अनेकांवर भारताविरुद्ध युद्ध पुकारल्याच्या अनेक प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल केला होता.
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा