जम्मू- काश्मीरमधील किश्तवाडमध्ये दहशतवाद्याला घातले कंठस्नान

तीन दिवसांपासून सुरू होती शोध मोहीम

जम्मू- काश्मीरमधील किश्तवाडमध्ये दहशतवाद्याला घातले कंठस्नान

जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाडमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाल्याचे वृत्त असून यात सुरक्षा दलाला यश मिळाले आहे. चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. लष्कराच्या व्हाईट नाईट कॉप्सने शुक्रवारी या चकमकीबद्दलची माहिती दिली. अद्याप या परिसरात सुरक्षा दलाकडून शोध मोहीम राबवली जात असल्याची माहिती आहे.

किश्तवाड आणि उधमपूर जिल्ह्यातील छत्रू भागात संयुक्त शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. जंगलात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. विशिष्ट गुप्तचर माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. “ऑपरेशन छत्रूः विशिष्ट गुप्तचर माहितीच्या आधारे, ९ एप्रिल रोजी किश्तवाडच्या छत्रू जंगलात जम्मू आणि काश्मीर पोलिसांसह संयुक्त शोध आणि नष्ट मोहीम सुरू करण्यात आली. त्याच दिवशी संध्याकाळी दहशतवाद्यांशी उशिरा संपर्क स्थापित झाला,” असे व्हाईट नाईट कॉप्सने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

“दहशतवाद्यांशी प्रभावीपणे लढाई झाली आणि गोळीबार सुरू झाला. आतापर्यंत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले आहे. प्रतिकूल भूभाग आणि प्रतिकूल हवामान असूनही, आमच्या शूर सैनिकांकडून अथक कारवाई सुरू आहे,” असे आर्मी कॉर्म्सने पुढे सांगितले. यापूर्वी, उधमपूरचे एसएसपी आमोद अशोक नागपुरे यांनी सांगितले होते की जंगलात दोन ते तीन दहशतवादी लपले असल्याची शक्यता आहे. उंच पर्वत, नदी आणि घनदाट जंगलामुळे हा एक अतिशय दुर्गम भाग आहे. शोध मोहीम अजूनही सुरू आहे, असे एसएसपी नागपुरे यांनी सांगितले.

हे ही वाचा : 

दहशतवादी तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण आणि २०११ चे मोदींचे ट्वीट व्हायरल; काय आहे प्रकरण?

ट्रम्प यांच्या सवलतीनंतर भारतीय शेअर बाजार रुळावर; सेन्सेक्समध्ये उसळी

चीनला दणका; आयातीवरचा कर १२५ टक्के नव्हे, तर १४५ टक्के! कसा ते घ्या जाणून

न्यूयॉर्क: हडसन नदीत हेलिकॉप्टर कोसळून सीमेन्सच्या सीईओंचा मृत्यू

युद्धजन्य वस्तूंची वाहतूक आणि अतिरेक्यांच्या अनधिकृत हालचालींसह दहशतवाद्यांची रसद रोखण्यासाठी लष्कराने राष्ट्रीय महामार्ग ४४ (एनएच-४४) वर तैनाती आणि पाळत वाढवली आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या समन्वयाने अनेक ठिकाणी संयुक्त मोबाइल वाहन तपासणी नाके (एमव्हीसीपी) उभारण्यात आले आहेत. प्रमुख जंक्शन आणि प्रवेश-निर्गमन बिंदूंवर प्रगत वाहन स्कॅनर, एआय-आधारित फेशियल रेकग्निशन सिस्टम आणि ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन सिस्टम तैनात करण्यात आल्या आहेत.

भाजपाच्या प्रयोगशाळेत, काँग्रेसचा प्रयोग...  | Dinesh Kanji | Rahul Gandhi | Congress | Priyanka

Exit mobile version