सोमवार, २० सप्टेंबर रोजी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने एक मोठी कारवाई केली आहे. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथून रिजवान मोमीन नावाच्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी महाराष्ट्रात येऊन कारवाई करत एका दहशतवाद्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. तर महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानेही एका दहशतवाद्याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता आणखीन एका दहशतवाद्याला अटक झाल्यामुळे खळबळ माजली आहे.
१७ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील दहशतवाद विरोधी पथकाने परदेशात असलेल्या एका दहशतवाद्याला जोगेश्वराची येथून ताब्यात घेतले होते. ऍंथोनी उर्फ अन्वर उर्फ अनस असे या दहशहतवाद्याचे नाव आहे. त्याच्यावर बेकायदेशीर प्रतिबंधक कृत्ये अधिनियम, १९६७ च्या कलमी १८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणात जाकीर हुसेन शेख याच्या विरोधात लुक आउट नोटीस जारी करून १८ सप्टेंबर अटक करण्यात आली होती.
हे ही वाचा:
काँग्रेस शासित राजस्थानमध्ये हिंदू मुलाचे ‘लिंचिंग’
तक्रारदार स्थानबद्ध तर गावगुंड राज्यभर मुक्त
या आरोपीची पोलिस कोठडीत चौकशी सुरु असतानाच रिझवान इब्राहिम मोमीन (वय वर्ष ४०) याचे नाव समोर आले. रिजवान हा मुंब्रा येथील रहिवासी असल्याचा उलगडाही पोलीस चौकशीतून झाला. यानंतर दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करत मोमीन याला अटक केली आहे. मोमीन याच्या अटकेनंतर त्याच्या मुंब्र्यातील घराची झाडाझडती घेण्यात आली. या तपासातून काही संशयास्पद गोष्टी पोलिसांना मिळाल्या आहेत. पोलिसांनी हे सारे दस्तऐवज ताब्यात घेतले असून त्यांचा पुढील तपास सुरु आहे.