पोलीस महासंचालकांच्या हत्येची पीएएफएफ दहशतवादी संघटनेने घेतली जबाबदारी

पोलीस महासंचालकांच्या हत्येची जबाबदारी लष्कर-ए-तोयबाशी संलग्न असणाऱ्या पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट (पीएएफएफ) या दहशतवादी संघटनेने घेतली आहे.

पोलीस महासंचालकांच्या हत्येची पीएएफएफ दहशतवादी संघटनेने घेतली जबाबदारी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सध्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत. दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये पोलीस महासंचालकांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवार, ३ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा तुरुंग विभागाचे पोलीस महासंचालक हेमंत लोहिया यांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. त्यात आता त्यांच्या हत्येची जबाबदारी लष्कर-ए-तोयबाशी संलग्न असणाऱ्या पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट (पीएएफएफ) या दहशतवादी संघटनेने घेतली आहे.

लोहिया यांना ऑगस्ट महिन्यात पोलीस महासंचालक (तुरुंग प्रशासन) ही जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. जम्मूतील उदयवाला भागातील एका घरात लोहिया यांचा मृतदेह आढळून आला आहे.

दरम्यान, हेमंत लोहिया यांच्या हत्येची जबाबदारी पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. हत्येनंतर त्यांनी एक पत्रक जारी केलं आहे. “आमच्या विशेष पथकाने गुप्त अभियान राबवलं आहे. त्यामध्ये पोलीस महासंचालक हेमंत लोहिया यांची हत्या केली आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यापूर्वी ही एक छोटीशी भेट आहे,” अशा आशयाचा संदेश त्यांनी दिला आहे.

हे ही वाचा:

उत्तर कोरियाने जपानवरुन क्षेपणास्त्र डागले

जम्मू काश्मीरमध्ये पोलीस महासंचालकांची गळा चिरून हत्या

मुंबई विमानतळावरून ९.८ कोटींचे कोकेन जप्त

काँग्रेसच्या पाच नेत्यांना ईडीकडून समन्स

जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक हेमंत लोहिया यांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात लोहिया यांच्या मदतनीसावर संशय आहे. या घटनेनंतर तो फरार झाला आहे. हेमंत लोहिया यांच्या शरीरावर चाकूने वार केल्याचं पोलिसांना आढळून आलं आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, लोहिया यांच्या शरीरावर चाकूने वार करण्यात आले आहेत. लोहिया यांच्या पायाला तेल लावल्याचंही आढळून आलं आहे. त्यांचा पाय सुजला होता. आरोपीने लोहिया यांना गुदमरून मारलं, त्यानंतर सॉसच्या बाटलीच्या काचेने त्यांचा गळा चिरला आणि मग त्यांचा मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती समोर आली आहे.

Exit mobile version