जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांना लक्ष्य करत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वीच जम्मू आणि काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात सरकारी कर्मचारी असलेले काश्मिरी पंडित राहुल भट यांची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली होती. त्यानंतर आता ‘लष्कर-ए-इस्लाम’ या दहशतवादी संघटनेने काश्मिरी पंडितांना धमकीचे पत्र लिहिले आहे. त्यामुळे काश्मिरी पंडितांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील हवाल ट्रांझिटमध्ये राहणाऱ्या काश्मिरी पंडितांना हे धमकीचे पत्र पाठवण्यात आले असून हवालमधील स्थलांतरित वसाहतीच्या अध्यक्षांना उद्देशून पत्र लिहिण्यात आले आहे. “इथून निघून जा किंवा मृत्यूला सामोरे जा. काश्मिरी मुस्लिमांना मारण्यासाठी आलेल्या काश्मिरी पंडितांना काश्मीरमध्ये आणखी एक इस्त्रायल हवा आहे. तुमची सुरक्षा दुप्पट किंवा तिप्पट करा. पण, हल्ल्यासाठी तयार राहा. तुम्ही मरणार आहात,” अशी धमकी या पत्रातून देण्यात आली आहे.
Now This! pic.twitter.com/VVHwLDl2bu
— Bhasha Sumbli (@bhashasumbli) May 15, 2022
हे ही वाचा:
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळ दौऱ्यावर
होय, मुंबई वेगळी करायची आहे, पण तुमच्या भ्रष्टाचारापासून!
तुमच्या सत्तेच्या बाबरी ढाच्याला खाली केल्याशिवाय राहणार नाही
जम्मू आणि काश्मीरच्या सरकारी कार्यालयात १२ मे रोजी काश्मिरी पंडित राहुल भट यांची दहशतवाद्यांनी हत्या केल्यानंतर काही दिवसांनीच ही घटना घडली आहे. या हल्ल्यानंतर, काश्मिरी पंडित समुदायातील सरकारी कर्मचाऱ्यांनी शनिवारी जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांना पत्र लिहून काश्मीर खोऱ्यातून बाहेर काढण्याचे आवाहन केले आहेत. तसेच त्यांनी नोकरीचे राजीनामे दिले असून काश्मीर आमच्यासाठी सुरक्षित नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. काश्मिरी पंडित समुदायाने संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये निदर्शने केली होती तर सरकारला त्यांना सुरक्षा पुरवण्याची विनंती केली आहे.