शोपियानमध्ये दहशतवाद्याला कंठस्नान

शोपियानमध्ये दहशतवाद्याला कंठस्नान

दहा दिवसांपूर्वी दहशतवादामध्ये सामील झालेला एक दहशतवादी दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील रखमा गावात चकमकीत ठार झाला असल्याचे सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

पोलीस आणि लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्सने रात्री उशिरा शोपियानमध्ये संयुक्त कारवाई सुरू केली. या चकमकीत हा दहशतवादी ठार झाला.

सुरक्षा विभागाचे प्रवक्ते इम्रॉन मुसावी यांनी सांगितले की, “जम्मू आणि कश्मीर पोलिसांकडून रखामा गावाच्या परिसरात दहशतवाद्याच्या उपस्थितीबद्दल गुप्तचर विभागाकडून माहिती मिळाल्यानंतर सैन्याने संयुक्त ऑपरेशन सुरू केले आणि पहाटे २ पर्यंत घेराव घातला गेला. तिथे एक दहशतवादी होता, त्याला शरणागतीसाठी अनेकवेळा सांगण्यात आले पण त्याने सैन्यावर गोळीबार केला आणि शेवटी सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात त्याला ठार केले.

ते म्हणाले की, “पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादाची ओळख कुलगाम जिल्ह्यातील रेडवानी येथील मुजीब अमीन लोन म्हणून झाली आहे. “तो २१ सप्टेंबरच्या सुरुवातीला दहशतवादी गटामध्ये सामील झाला होता. या परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी त्याची नेमणूक केली होती. तो निरपराध नागरिकांना देशद्रोह्यांबद्दल सहानुभूती दाखवण्यास भाग पाडत होता.

हे ही वाचा:

कन्हैया कुमार हा दुसरा नवज्योतसिंग सिद्धू

अमरिंदर-शहा भेटीनंतर चन्नी-मोदी भेट

ठाकरे सरकारच्या काळात मराठी भाषा मंत्रालयासमोर भीक मागत उभी आहे

एअर इंडियाबाबत कोणताही निर्णय नाही

गेल्या नऊ दिवसांत काश्मीरमध्ये वेगवेगळ्या कारवायांमध्ये आठ अतिरेकी ठार झाले आणि उरी सेक्टरमधील नियंत्रण रेषेजवळ एक पाकिस्तानी दहशतवादी जिवंत पकडला गेला. मारल्या गेलेल्या अतिरेक्यांपैकी चार जण ताजे घुसखोर असल्याचे समजले जाते जे हटलंगा आणि उरीमध्ये मारले गेले होते. तर १८ वर्षीय पाकिस्तानी अतिरेक्याने दुसरा पाकिस्तानी दहशतवादी मारला गेल्यानंतर आत्मसमर्पण केले होते.

Exit mobile version