मुंबईला दहशतवादी हल्ल्याची धमकी

खबरदारी म्हणून इतर शहरांनाही अलर्ट करण्यात आलेले आहे

मुंबईला दहशतवादी हल्ल्याची धमकी

मुंबईला दहशतवादी हल्ल्याची पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. एनआयएच्या ईमेल आयडीवर धमकीचा मेल आल्याने खळबळ उडालेली आहे.

एनआयएकडून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षालाही गुरूवारी रात्री १२ च्या सुमारास हा मेल पाठवण्यात आला असून सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खबरदारी म्हणून इतर शहरांनाही अलर्ट करण्यात आलेले आहे. मुंबई पोलिस आणि इतर तपास यंत्रणांकडून कसून तपास करण्यात येत आहे.

या मेलमध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्यात येणार असल्याची धमकी देण्यात आलेली आहे. तालिबानी असल्याचा दावा मेल करणाऱ्या व्यक्तीने केलेला आहे. तालिबान संघटनेचा प्रमुख नेता सिराजुद्दीन हक्कानी यांनी हा आदेश दिला असल्याचेही यात नमूद करण्यात आलेले आहे.

या प्रकारानंतर तपास यंत्रणा कामाला लागली असून हा मेल कुठून व कुणी केला, हा खोडसाळपणा तर नाहीना याचाही पोलिस तपास करत आहेत. मुंबई पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणे, रेल्वे स्थानक, विमानतळ यांसह अनेक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक केलेली आहे.

हेही वाचा :

करमाफीनंतर का उडाला गोंधळ?

प्रभादेवीत दारूड्यांची जत्रा

बनावट नोटांच्या साठ्यासह नऊ आरोपींना अटक

दिव्यांग, अनाथ युवकांसाठी दीपस्तंभ मनोबल देशातील आदर्श प्रकल्प 

मुंबईवर याआधीही दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आलेली होती. ट्रॅफिक कंट्रोलच्या WHATSAPP क्रमांकावर धमकीचे तब्बल २६ मेसेज पाठवले गेले होते. मुंबईवर केलेल्या २६/११ सारखा दहशतवादी हल्ला होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. कंट्रोल रूमच्या नंबरवर पाकिस्तानातून ही धमकी देण्यात आली होती. या हल्ल्याच्या धमकीप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने विरार परिसरातून एका व्यक्तीला ताब्यातही घेतले होते.

Exit mobile version