CISF जवानांच्या बसवर दहशतवाद्यांचा हल्ला; एका जवानाला वीरमरण

CISF जवानांच्या बसवर दहशतवाद्यांचा हल्ला; एका जवानाला वीरमरण

जम्मू – काश्मीरमध्ये सेन्ट्रल इंडस्ट्रियल सेक्युरिटी फोर्सच्या (CISF) जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जम्मू येथील चड्ढा कॅम्पजवळ पहाटे ४.१५ वाजता १५ CISF च्या जवानांना कामावर घेऊन चाललेल्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात CISF च्या जवानांनी जोरदार प्रत्युत्तर देत हल्लेखोर दहशतवाद्यांना पळवून लावले.

या हल्ल्यानंतर जवानांनी या हल्ल्याला प्रत्युत्तर देत असताना दहशतवाद्यांनी पळ काढल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. तसेच या हल्ल्यात एक जवानाला वीरमरण आले असून दोन जवान जखमी झाले आहेत.

हे ही वाचा:

आजपासून उदगीरमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

सिग्नलला फडका बांधून देवगिरी एक्स्प्रेसवर दरोडा

सर्वोच्च न्यायालयात सगळेच वकील म्हणाले, जहांगीरपुरीमध्ये अतिक्रमणे!

पनवेलचा सागर म्हात्रे ठरला पहिला मराठी इंडियन आयडॉल

दरम्यान, जम्मू- काश्मीरमधील सुंजवान भागातही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. यामध्ये सीआयएसएफचे एएसआय एसपी पटेल यांना वीरमरण आले. तसेच चार जवान जखमी झाले आहेत, असे जम्मूचे एडीजीपी मुकेश सिंग यांनी सांगितले. तसेच जैश-ए-मोहम्मदचे दोन दहशतवादी पकडण्यात यश आले आहे. जम्मू-काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफने ही संयुक्त कारवाई केली आहे. या चकमकीमुळे जम्मूच्या काही भागात मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

Exit mobile version