जम्मू काश्मीरच्या गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला

दोन जवानांसह चार मृत्युमुखी

जम्मू काश्मीरच्या गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला

जम्मू- काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी लष्करी वाहनाला लक्ष्य केलं आहे. गुलमर्गजवळ दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर केलेल्या हल्ल्यात दोन जवांनासह लष्करात कुली म्हणून काम करणाऱ्या दोन जणांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वीच दहशतवाद्यांनी जम्मू- काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील गगनगीर भागात मोठा हल्ला केला होता. सात जणांचा जागीच मृत्यू झाला होता तर काही जण गंभीर जखमी झाले होते. आता पुन्हा एकदा काश्मीर खोऱ्यातील गुलमर्गजवळ दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे.

काश्मीर खोऱ्यातील गुलमर्गजवळ गुरुवारी दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनाला लक्ष्य केलं आहे. या हल्ल्यामध्ये लष्कराचे दोन जवान हुतात्मा झाले असून लष्करात कुली म्हणून काम करणाऱ्या दोन जणांचाही मृत्यू झाला आहे. तर, या हल्ल्यात तीन जवान जखमी झाले असल्याची माहिती समोर आली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यानंतर या परिसरात दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी लष्कराच्या जवानांकडून शोध मोहीम राबवण्यात येत आहे. काश्मीरमधील गुलमर्ग सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ हा दहशतवादी हल्ला झाला. बुटा पाथरी सेक्टरमध्ये नागिन पोस्टच्या आसपास सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा : 

बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार!

अल्पवयीन विद्यार्थ्याने ब्लेडने कापून घेतले आणि हिंदू नेत्याने अपहरण केल्याचा बनाव रचला

पालिकेचे खबरी समजून तिघांना विवस्त्र करत गुप्तांगांना दिले शॉक

प्रभू श्रीरामांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या अल्पवयीन मुस्लीम तरुणाला अटक

जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या घटनांवर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “उत्तर काश्मीरमधील बुटा पाथरी भागात लष्कराच्या वाहनांवर झालेल्या हल्ल्याची अत्यंत दुर्दैवी बातमी. काश्मीरमधील अलीकडच्या काळात होत असलेले हे हल्ले हा गंभीर चिंतेचा विषय आहे. मी या हल्ल्याचा कठोर शब्दांत निषेध करतो आणि ज्या लोकांचे प्राण गमावले त्यांच्या प्रियजनांना माझ्या संवेदना व्यक्त करतो,” असं ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version