30 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरक्राईमनामापुण्यातील इसिस मॉड्यूल प्रकरणातील दहशतवाद्यास अटक

पुण्यातील इसिस मॉड्यूल प्रकरणातील दहशतवाद्यास अटक

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडून धडक कारवाई

Google News Follow

Related

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने धडक कारवाई करत इसिस मॉड्यूल प्रकरणात एका दहशतवाद्यास अटक केली आहे. पुणे शहरात इसिस मॉड्यूल प्रकरणात सक्रीय असणारे दहशतवादी राष्ट्रीय तपास संस्थेच्या म्हणजेच एनआयएच्या आणि पुणे पोलिसांच्या रडारवर होते. या दहशतवाद्यांचा शोध गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होता. एनआयएने दहशतवाद्यांचा मुसक्या आवळण्यासाठी आक्रमक कारवाई सुरू केली होती. अखेर दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला यश आले आहे.

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने इसिस मॉड्यूल प्रकरणात एका दहशतवाद्यास अटक केली. या दहशतवाद्याचे नाव शाहनवाज असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे एनआयएने या दहशतवाद्यावर तीन लाखांचे बक्षीस ठेवले होते. तसेच एनआयएच्या मोस्ट वॉटेंड दहशतवाद्याच्या यादीत त्याचा सहभाग होता. शाहनवाज उर्फ शैफी उज्जमा अशी त्याची ओळख पटविण्यात आली आहे.

पुणे पोलिसांनी १८ जुलै रोजी दोन दशतवाद्यांना पकडले होते. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासादरम्यान इसिस मॉड्यूलचा खुलासा झाला होता. यामुळे हे प्रकरण पुणे एटीएसकडून एनआयएकडे देण्यात आले. या दहशतवाद्यांनी आईईडी बनवण्याचे प्रशिक्षण घेतले होते. तसेच इतर काहींना प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळा घेतली होती. स्फोटाची चाचणी त्यांनी साताऱ्यातील जंगलात केली होती, असे अनेक धक्कादायक खुलासे तपासात झाले होते.

हे ही वाचा:

जीएसटी संकलनात १०.२ टक्के वाढ!

स्केटिंग रिलेमध्ये भारताची दोन कांस्य पदकांची कमाई

ते जर्मनीच्या अध्यक्षांचे निवासस्थान, बोर्डिंग स्कूल नव्हे!

अविनाश साबळेची सोनेरी धाव!

शाहनवाज हा इंजीनिअर असून पुणे पोलिसांच्या कस्टीडीतून तो फरार झाला होता. तो दिल्लीत राहत होता. त्याची एनआयए आणि दिल्ली पोलीस कसून चौकशी करत आहे. एनआयए आणि पोलिसांनी आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे. तीन दहशतवादी फरार झाले होते. ते दिल्लीत लपलेले होते. त्यात शाहनवाज उर्फ शैफी उज्जमा होता. यामधील काही जणांना पुणे शहरातील कोंढवामधून अटक केली होती. तर काही जणांना मुंबई आणि ठाण्यातून अटक करण्यात आली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा