24.8 C
Mumbai
Monday, January 6, 2025
घरक्राईमनामामुंबईत २६/११ पेक्षा मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा होता कट

मुंबईत २६/११ पेक्षा मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा होता कट

दोघे इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या खुरासान प्रांताच्या सुफा गटासाठी काम करत होते.

Google News Follow

Related

गेल्या आठवड्यात पुण्यातील दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) दोघा दहशतवाद्यांना अटक केली. त्यांनी २६/११च्या दहशतवादी हल्ल्यापेक्षा मोठा हल्ला करण्याचा कट आखला होता, असे सूत्रांनी सांगितले. एटीएसने पुण्यातील कोथरूड परिसरातून मोहम्मद इमरान आणि मोहम्मद युनूस याला अटक केली होती. ते दोघे इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या खुरासान प्रांताच्या सुफा गटासाठी काम करत होते. राष्ट्रीय तपास संस्थेचे पथक राजस्थानच्या एका प्रकरणात त्यांचा शोध घेत होते.

 

एटीएसने शुक्रवारी इमरान आणि युनुसला मदत करण्याच्या आरोपात रत्नागिरीतील पेंडारीमधील सिमाब नसरुद्दीन काजी यालाही अटक केली. मॅकेनिकल इंजिनीअर असलेल्या काजीने कोंढवास्थित ग्राफिक डिझायनर कादिर दस्तगीर पठाण याला पैसे पाठवले होते.

हे ही वाचा:

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ९४ लाख अधिक प्राप्तिकर विवरणपत्रे

भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत १५ पदांसाठी दुप्पट अर्ज

मणिपूर हिंसाचाराचा अर्थव्यवस्थेवर परिणाम; जीएसटी संकलनात घट

संजय राऊत यांनाच आता पवारांसाठी शंभर जन्म घ्यावे लागतील बहुतेक !

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इमरान आणि युनुस हे कट्टर इस्लामिक स्टेटसाठी काम करत. त्यांनी मुंबईतील कुलाब्यातील झोपडपट्टीजवळील छब्बड हाऊस आणि नौदलाच्या हेलिपॅडसहित महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केली होती. मंदिरांवरही हल्ला करण्याचा त्यांचा कट होता, अशी माहिती या सूत्रांनी दिली. त्यांच्याकडे शहरातील महत्त्वाची ठिकाणे, सुरू असलेले मोठमोठे प्रकल्प यांचे अद्ययावत नकाशेही आढळले आहेत. मात्र काही पाऊल उचलण्याच्या आतच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या.

 

या दोघा दहशतवाद्यांच्या लॅपटॉपमधूनही अनेक माहिती उघड झाली आहे. त्यांनी मोठा पोलिस बंदोबस्त असणाऱ्या अति महत्त्वाच्या व्यक्तींबाबतही बराच तपास केला होता. एका बाजूला ते रेकी करत होते, तर दुसरीकडे ते त्यांच्या माणसांना इम्प्रोव्हाइज्ड एक्स्प्लोझिव्ह डिव्हाइज (आयईडी) आणि स्फोटके बनवण्याचे प्रशिक्षण देत होते. त्यांच्याकडून अशा प्रशिक्षणाचे साहित्यही जप्त करण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा