मुंबईतुन खुंखार अतिरेक्याला अटक, एटीएसची कारवाई मुंबई – संचित रजेवर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेच्या कार्यालयावर रॉकेट बॉम्बने हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांपैकी एका अतिरेक्याला मुंबईतील मालाड येथून अटक करण्यात आली आहे. हि कारवाई महाराष्ट्र एटीएस ने गुरुवारी केली असून या अतिरेक्याचा ताबा पंजाब पोलिसाकडे सोपविण्यात आले आहे.
चरतसिंग उर्फ इंद्रजितसिंग कारीसिंग उर्फ करज सिंग (३०) असे अटक करण्यात आलेल्या अतिरेक्यांचे नाव आहे. चरतसिंग हा अतिरेकी कॅनडा स्थित लकबीरसिंग लांडा या अतिरेक्याच्या संपर्कांत होता अशी माहिती एटीएसने दिली आहे. चरतसिंग याच्यावर पंजाब मध्ये ८ पेक्षा अधिक गंभीर गुन्ह्याची नोंद असून एका खुनाच्या गुन्ह्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती, व तो पंजाबच्या कपुर्थळा तुरुंगात शिक्षा भोगत होता. मार्च महिन्यात चरतसिंग हा २ महिन्याच्या संचित रजेवर तुरुंगातून बाहेर आला होता, त्यानंतर तो कॅनडास्थित लकबीरसिंग लांडा या अतिरेक्याच्या संपर्कांत आला होता.
हे ही वाचा
‘ते’ एसटी कर्मचारी सेवेत येणार असल्याचा जल्लोष
मुंबई, दिल्लीत दहशतवादविरोधी बैठक
हिजाब बंदीवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींमध्ये मतभेद, आता मोठ्या खंडपीठात होणार सुनावणी
ठाकरे गटाच्या मशालीवर ‘या’ पक्षाने केला दावा
९ मे २०२२ रोजी पंजाब पोलिसांच्या गुप्तचर विभागाच्या कार्यालयावर झालेल्या रॉकेट बाँम्ब हल्ल्यात चरतसिंग याचा सहभाग होता, या अतिरेकी हल्ल्या प्रकरणी पंजाब पोलीस यंत्रणा चरतसिंग याचा कसून शोध घेत होती. चरतसिंग हा मुंबईत दडून बसला होता, व येथून तो कॅनडाला पळून जाण्याची तयारी करीत होता, यादरम्यान महाराष्ट एटीएसला त्याची कुणकुण लागली होती, चरतसिंग मालाड येथे असल्याची माहिती एटीएसला मिळाली असता गुरुवारी एटीएसने मालाड येथे छापा टाकून चरतसिंग याला अटक करून पंजाब पोलिसांना त्याचा ताबा देण्यात आला आहे.