नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि स्मृती मंदिर परिसराची रेकी करणाऱ्या एका दहशतवाद्याला नागपूर दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई करत ताब्यात घेतलं आहे. नागपूरच्या दहशतवाद विरोधी पथकाने काश्मिरमधून रईस शेख याला अटक केली असून त्याच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि स्मृती मंदिर परिसराची रेकी करण्याचा आरोप आहे.
पाकव्याप्त काश्मीरमधून जैश-ए-मोहम्मदच्या हस्तकाच्या सांगण्यावरून रईस शेख जुलैमध्ये महाराष्ट्रातील नागपूर येथे आला होता. त्यानंतर त्याने १५ जुलै २०२१ ला नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची इमारत आणि हेडगेवार स्मृती मंदिराची पाहणी केली. त्यानंतर तो काश्मिरला परतला. सप्टेंबर २०२१ मध्ये रईसला काश्मीर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे अटक केली.
हे ही वाचा:
आरेमधल्या झाडांसाठी लढणाऱ्या शिवसेनेची वाशीमधल्या झाडांसाठी चुप्पी
…म्हणून भारताच्या नकाशात दिसतो श्रीलंका!
जम्मू-काश्मीरमध्ये दारूच्या दुकानावरील ग्रेनेड हल्ल्यात एक ठार
पहिल्यांदा तक्रार करू…पण कारवाई झाली नाही तर सोडणार नाही
नागपुरमध्ये कोतवाली पोलिसांनी रईस शेखच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर नागपूर दहशतवाद विरोधी पथकाने काश्मिरला जाऊन त्याला ताब्यात घेतलं. रईस शेखची सध्या कसून चौकशी सुरू आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, रईस जुलैमध्ये नागपूरला गेला होता. तसेच संशय येऊ नये म्हणून त्याने श्रीनगर ते दिल्ली, दिल्ली ते मुंबई आणि मुंबई ते नागपूर असा विमान प्रवास केला. तसेच हॉटेलमध्ये रुम बूक केली आणि रिक्षाने दोन्ही ठिकाणांची रेकी केली. या ठिकाणांचा व्हिडीओ घेऊन त्याने तो हस्तकाला पाठवला.