31 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरक्राईमनामाजम्मू-काश्मीरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ३० नेत्यांना दहशतवादी संघटनेकडून धमकी

जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ३० नेत्यांना दहशतवादी संघटनेकडून धमकी

दहशतवाद्यानी तयार केली यादी, या प्रकरणी चौकशी करण्यात येत आहे.

Google News Follow

Related

जम्मू – काश्मीरमधून खळबळजनक वृत्त आहे. काश्मीरमधील परिस्थितीत सुधारणा करण्यात राज्यातील प्रशासनाला आलेले यश दशतवाद्यांच्या डोळ्यात खुपत आहे. ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ या दहशतवादी संघटनेने जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक सदस्यांना धमक्या दिल्या आहेत. हा गट पाकिस्तानस्थित दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबाचा भाग आहे. सरकारने जानेवारीमध्ये प्रतिबंधित संघटना म्हणून घोषित केले होते.

काश्‍मीर दहशतवादी संघटनेने आपल्या निशाण्यावर असलेल्या ३० संघ नेत्यांची यादी जारी केली आहे. आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी “अखंड भारत” च्या कल्पनेचा पुनरुच्चार केल्यानंतर अवघ्या तीन दिवसांनी ही धमकी आली असल्याचे म्हटल्या जात आहे. या धमकी प्रकरणी टीआरएफने जारी केलेले पत्र सोशल मीडिया साइटवर व्हायरल झाले आहे.

एकीकडे संघ आणि भाजपचे लोक हिंदुत्वाची विचारधारा राबवण्याचा करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि दुसरीकडे आरएसएससारखी संघटना इस्लाम आणि इतर धर्मांना बदनाम करण्याचा अजेंडा चालवत आहे. खोऱ्यात असे काही लोक आहेत जे या संघटनेत सामील झाले आहेत.या नेत्यांना आम्ही लक्ष्य करणार असल्याचे या पत्रात म्हटले आहे.

‘द रेझिस्टन्स फ्रंट’ने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधीत असलेल्या मुस्लिम नेत्यांनाही धमकावले आहे. त्यामुळे आम्ही या धमकीचा खरेपणा देखील तपासत आहोत,असे भारत सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे. या यादीत कोणत्याही मोठ्या नावाचा समावेश नाही. जम्मू आणि काश्मीर सरकारच्या जवळच्या वाटत असलेल्यांना अशा दहशवादी संघटना दहशतवादी संघटना धमक्या देतात. तरीपण या धमकीच्या प्रत्येक पैलू आम्ही पडताळून बघत आहोत असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा:

धोकादायक !! रेसिंगवर पैज लावत होते; ४२ बाईक आणि स्वार ताब्यात

अडीच वर्षांच्या कारभारावरून फडतूस कोण हे लोकांना ठाऊक आहे!

सरकार बदलले, साधू वाचले? पालघरच्या त्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या…

मारहाणीचे राजकारण करण्यासाठी ठाण्यात सगळे ठाकरे एकवटले

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांच्या निमंत्रणावरून एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ येत्या आठवड्यात काश्मीरला भेट देणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सक्रिय असलेली रेझिस्टन्स फ्रंट ही लष्कर-ए-तैयबाची शाखा आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याच्या विरोधात ही आघाडी ऑनलाइन मोहीमही चालवते कराचीतील या ऑनलाइन मोहिमेला ६ महिन्यांनंतरच या आघाडीने तळागाळात आपली संघटना तयार केली असे पोलिसांच्या हवाल्याने असे सांगण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा