दिल्लीत घडले भयंकर कृत्य; नात्यातील गुंतागुंत आणि अंजनचे १० तुकडे

दिल्लीत हत्येचे सत्र सुरूच

दिल्लीत घडले भयंकर कृत्य; नात्यातील गुंतागुंत आणि अंजनचे १० तुकडे

श्रद्धा वालकर हत्या प्रकरण ताजे असतानाच या प्रकरणासारखीच आणखी एक घटना समोर आली आहे. दिल्लीतील त्रिलोकपुरी येथील अंजन दास यांच्या हत्येचे गूढ दिल्ली पोलिसांनी उकलले आहे. अंजन दासची हत्या केल्यानंतर त्याच्या मृतदेहाचे श्रध्दाप्रमाणे तुकडे करण्यात आले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजनची आपल्या सावत्र मुलाची पत्नी आणि घटस्फोटित सावत्र मुलीवर वाईट नजर होती. त्यामुळे संतापलेल्या पत्नी आणि सावत्र मुलाने मिळून ही हत्या केली. अंजन दासची हत्या केल्यानंतर दोघांनी त्याच्या मृतदेहाचे दहा तुकडे केले आणि दिल्लीच्या विविध भागात फेकून दिले.

पोलिसांनी सांगितले की, अंजन दास यांची पत्नी आणि सावत्र मुलाने ३० मे रोजी हत्या केली होती. हत्येपूर्वी अंजनला गुंगीचे औषध पाजले होते. काही औषधे दारुमध्ये मिसळून दिली होती. यामुळे तो बेशुद्ध पडला. त्यानंतर दोघांनी आधी अंजनचा शिरच्छेद केला. अंजनच्या शरीरातून पूर्णपणे रक्तस्त्राव झाल्यानंतर दोघांनी तिच्या शरीराचे १० तुकडे केले आणि ते तुकडे दिल्लीच्या विविध भागात फेकून दिले.

पोलिस उपायुक्त अमित गोयल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अंजन दास हा बिहारचा रहिवासी आहे. तिथे त्याचे आधीच लग्न झाले होते. अंजन दास लिफ्ट ऑपरेटर म्हणून काम करायचे. एवढेच नाही तर अंजनला आधीच ८ मुले होती. पूनम त्यांची दुसरी पत्नी होती.

हे ही वाचा:

आफताबच्या गाडीवर तलवारीने हल्ला; प्रकरण चिघळले

बेलापूरहून अलिबागला जा आता वॉटर टॅक्सीने

‘डीजे स्नेक’ कार्यक्रमात चाहत्याना चोरांचा दंश

सेंट्रल लायब्ररीच्या निमित्ताने मविआ सरकारने घातला राज्याच्या तिजोरीवरच दरोडा

२०११ मध्ये पूनम अंजनला भेटली होती. दोघांनी २०१७ मध्ये लग्न केले होते. पूनमशी लग्न केल्यानंतर त्याने तिचे दागिने विकून पैसे बिहारला पाठवले होते. त्यानंतर अंजनच्या हत्येचा कट रचला गेला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनम आणि दीपक यांनी अंजनला आधी दारू पाजली. झोपेच्या गोळ्या मिसळल्याने त्याचा संयम सुटला. यानंतर मृतदेहाचे चाकूने १० तुकडे करण्यात आले. पोलिसांनी ६ तोळे जप्त केले असून उर्वरित ४ तोळे सोन्याचा शोध सुरू आहे.

Exit mobile version