28 C
Mumbai
Wednesday, January 1, 2025
घरक्राईमनामाभरधाव कार घुसली कंटेनरखाली...पाच जणांनी गमावले प्राण

भरधाव कार घुसली कंटेनरखाली…पाच जणांनी गमावले प्राण

Google News Follow

Related

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर आज सकाळी भीषण अपघाताची घटना घडली आहे. मुंबईवरुन पुण्याच्या दिशेन जाणाऱ्या कारने कंटेनरला जोरात धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये कारचा चुराडा झाला आणि पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर शिलाटणे गावानजीक हा अपघात झाला आहे. सकाळी ८ च्या सुमारास ही घटना घडली. फोर्ड इको स्पोर्ट ही कार मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने जात होती. त्याचवेळी कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. शिलाटणे गावाजवळ ही कार दुभाजक ओलांडून पलीकडच्या दिशेला गेली. कारचा वेग इतका होता की समोरून येणाऱ्या कंटेनरच्या खाली ही कार घुसली.

हे ही वाचा:

पालकमंत्री अस्लम शेख यांच्या बॅनरबाजीने नगरसेवक वैतागले!

जीवाच्या भीतीने कॅनडाचे राष्ट्रपती अज्ञातवासात

“नथुरामने गांधींचा ‘वध’ केला”

…तर वायनरी त्यांच्या नावावर करायला तयार!

हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आणि आयआरबी देवदूत पेट्रोलिंग घटनास्थळी दाखल झाले आहे. कारमधील मृतदेह बाहेर काढणे देखील कठीण काम होते. अपघातातील मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. या अपघातामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी झाली होती.

तीन महिन्यांपूर्वी याच ठिकाणी सहा वाहने एकमेकांना धडकून विचित्र व भीषण अपघात झाला होता. यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला होता, तर सहा जण जखमी झाले होते. या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. तेसेच, गेल्या महिन्यात मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर एका चारचाकी वाहनाचा टायर फुटून अपघात झाला होता. यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला होता आणि एक महिला गंभीर जखमी झाली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा