कर्नाटकातील शिवामोग्गामध्ये बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्ष याची हत्या झाल्यानंतर आता वातावरण तापू लागले आहे. शिवामोग्गामधील अनेक दुकानांची तोडफोड करण्यात आली असून गाड्यांना आगीही लावण्यात आल्या आहेत. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत.
बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्ष याच्यावर काही अज्ञातांनी हल्ला करून धारदार शस्त्रांनी त्याची हत्या केली. त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. हिजाबच्या वादासंदर्भात त्याने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टनंतर त्याच्यावर हल्ला होण्याची शक्यता निर्माण झाली होती. शेवटी त्याची हत्याच करण्यात आली.
सध्या शिवामोग्गा येथे १४४ कलम लागू करून जमावबंदी करण्यात आली आहे. पोलिसांनी मात्र परिस्थितीत नियंत्रणात असल्याचे म्हटले आहे.
हर्ष याचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी नेत असताना तिथे दगडफेक झाली. सिगेहट्टी येथे काही गाड्य़ांना आगी लावण्यात आल्या. हिंदु संघटनांचे कार्यकर्ते आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. ही परिस्थिती सावरण्यासाठी पोलिसांची पथके तिथे रवाना झाली असून या विभागातील पोलिस अधीक्षक मुरुगन तात्काळ रवाना झाले आहेत.
हे ही वाचा:
झारखंड सरकारचे उर्दू प्रेम उफाळले; भोजपुरी, माघी भाषा वगळल्या
एकनाथ शिंदेंच्या गडाला भाजपाचा सुरुंग! ३०० शिवसैनिकांचा भाजपामध्ये प्रवेश
लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षांची शिक्षा आणि ६० लाखांचा दंड
‘रश्मी ठाकरे यांनी सरपंचांना बंगले नावावर करण्यासाठी लिहिले होते पत्र’
गेल्या महिन्यापासून देशभरात हिजाबवरून वातावरण तापलेले आहे. कर्नाटकातील उडुपी येथे एका कॉलेजात वर्गात हिजाब घालून जाण्याचा दुराग्रह करणाऱ्या मुलींना कॉलेज प्रशासनाने मनाई केल्यानंतर हा वाद उफाळला. हिजाब घालणे हा आमचा अधिकार आहे, अशी भाषा वापरत त्या मुलींनी कर्नाटकात आंदोलन सुरू केले. नंतर त्याचे पडसाद देशभरात उमटू लागले. बुरखा घातलेल्या अनेक महिलांना गोळा करून आंदोलने करण्यात येऊ लागली. आम्हाला हव्या त्या वेशात वावरण्याचा अधिकार आहे, अशा घोषणा देत अनेक ठिकाणी आंदोलनांना सुरुवात झाली.