28 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरक्राईमनामाबिहारमध्ये रामनवमीला झालेल्या दंग्याचे पडसाद कायम; गोळीबारात एक मृत्यू

बिहारमध्ये रामनवमीला झालेल्या दंग्याचे पडसाद कायम; गोळीबारात एक मृत्यू

बिहार शरीफ येथे १४४ कलम लागू करण्यात आले आहे.

Google News Follow

Related

रामनवमीला देशभरात लक्ष्य करण्यात आलेले असताना सर्वाधिक झळ ही बिहारमध्ये बसली. कारण रामनवमी होऊन काही दिवस लोटले तरीही अजून बिहारमध्ये तणावाचे वातावरण निवळलेले नाही. सासाराम आणि नालंदा येथे याचे पडसाद अजूनही उमटत आहेत. बिहार शरीफ येथे १४४ कलम लागू करण्यात आले आहे.

रात्री झालेल्या गोळीबारात गुलशनकुमार नावाच्या युवकाचा मृत्यू झाला. जिल्हाधिकारी शशांक शुभंकर आणि एसपी अशोक मिश्रा यांनी लोकांना घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत. पहाडपुरा, बडी दरगाह, खासगंज, मेहरपर याठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या असून गोळीबारही झाला आहे. आणखी तीन लोकांनाही गोळ्या लागल्याची बातमी येते आहेत. दोन पोलिसही या सगळ्या दंग्यात जखमी झाले आहेत.

बिहारशरीफ येथे कर्फ्यु लावण्यात आला आहे. २७ दंगेखोरांना अटक करण्यात आली आहे. लहेरी आणि बिहारशरीफ येथे ८ गुन्हे दाखल आहेत. तिथे इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

राहुल गांधींनी १० जन्म घेतले तरी ते सावरकरांसारखे होऊ शकणार नाहीत

चौथ्यांदा जीएसटी संकलनाने चौथ्यांदा केला १. ५ लाख कोटी रुपयांचा टप्पा पार

त्याने तयार केल्या होत्या तब्बल ११९ बनावट कंपन्या, पोलिसांनी गठडी वळली

इटलीमध्ये कार्यालयीन कामकाजात आता इंग्रजी भाषेवर बंदी , नियम मोडल्यास होणार दंड

सासाराम येथील गृहमंत्री अमित शहा यांची सभा रद्द करण्यात आली होती. तेथे अजूनही वातावरण तणावग्रस्त आहे. एका झोपडीत बॉम्ब फुटल्याची घटना घडली आहे. त्यात पाच लोक जखमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. २५ जणांना तिथे अटक करण्यात आली आहे. त्यातील १८ जणांना कोठडीत टाकण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा