बिहारच्या दानापूर गावात पुजाऱ्याची अत्यंत निर्घृण हत्या!

पुजाऱ्याचे डोळे काढले, गुप्तांग कापले गेल्याने गावात तणाव

बिहारच्या दानापूर गावात पुजाऱ्याची अत्यंत निर्घृण हत्या!

बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका पुजाऱ्याची शनिवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आणि त्याचे डोळे बाहेर काढण्यात आले आणि गुप्तांग कापण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे स्थानिक आणि पोलिसांमध्ये चकमक झाली, ज्यामध्ये दोन पोलिस अधिकारी किरकोळ जखमी झाले आहेत.

गोपालगंज जिल्ह्यातील दानापूर गावातील शिव मंदिराचा पुजारी मनोज कुमार हा गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता होता.अशोक कुमार शहा हे मृत मनोज कुमार यांचे भाऊ असून ते भाजपचे माजी विभागीय अध्यक्ष आहेत.पोलिसांनी सांगितले की, मनोज कुमार घरातून मंदिरात गेल्यावर गायब झाले होते.पोलिसांनी तपास सुरु केला होता, मात्र मनोज सापडला नाही, असे पोलिसांनी सांगितले.

शनिवारी पोलिसांना मनोज कुमार याचा मृतदेह गावातील झुडपात आढळून आला. याबाबतची माहिती मिळताच स्थानिकांनी पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप केला.त्यांनतर स्थानिकांनी पोलिस कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली आणि महामार्गावर उभ्या असलेल्या पोलिसांच्या वाहनाला आग लावली.जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला.गोपालगंज सदरचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) प्रांजल नंतर घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी संतप्त झालेल्या स्थानिकांना शांत करण्यात यश मिळवले.

हे ही वाचा:

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाआधी वॉशिंग्टनमध्ये उत्साहाची लाट

श्रेयस तळपदेचे हृदय चक्क १० मिनिटे थांबले होते!

पोप फ्रान्सिसचे माजी सल्लागार कार्डीनल अन्जेलो बेक्यूना तुरुंगवासाची शिक्षा

मोदींनी सूरतला नवा पैलू पाडला; विश्वविक्रमी डायमंड बोर्सचे उद्घाटन!

मनोज कुमारचा दुसरा भाऊ सुरेश शाहने सांगितले की, माझा भाऊ मनोज कुमार जेव्हा गायब झाला तेव्हा मी मंदिरात होतो.मनोज कुमार कुठेतरी बाहेर गेला असावा आणि तो लवकरच परत येईल असे मी माझ्या कुटुंबियांना सांगितले.परंतु, सहा दिवसांनंतर माझ्या भावाचा मृतदेह सापडला. माझा भाऊ मनोज याचा खून कोणी केला आणि का केला असावा हे आम्हाला माहीत नाही,असे सुरेश शहा म्हणाला.जिल्हा प्रशासनातील काही लोक घरी आले आणि लवकरच चौकशी केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे सुरेश शाहने सांगितले.

एसडीपीओ प्रांजल यांनी सांगितले की,सध्या गावातील परिस्थिती नियंत्रणात आली आहे.तसेच पुरेसा पोलीस बंदोबस्तही मागवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.”महामार्ग आता मोकळा झाला आहे. लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली. या प्रकरणी एफआयआर नोंदवून पुढील कारवाई केली जाईल,” असे पोलीस अधिकारी प्रांजल यांनी सांगितले.

Exit mobile version