पाकिस्तानमध्ये हिंदू महिलांवर अत्याचार करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. हिंदू स्त्रिया आणि मुलींशी जबरदस्तीने विवाह करणे आणि त्यांच्याशी गैरवर्तन करण्यासारखे प्रकार तर सामान्य झाले आहेत . या अत्याचाराचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. सिंध प्रांतात २२ ऑक्टोबर रोजी एका १० वर्षीय हिंदू मुलीचे ८० वर्षाच्या मुस्लिमाशी जबरदस्तीने लग्न लावून देण्याचा प्रकार घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जमीनदार मुल्ला रशीदच्या गुंडांनी १० वर्षांच्या मुलीचे अपहरण केले. तिला इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले. त्यानंतर तिचे लग्न मुल्ला रशीद या ८०वर्षीय विधुराशी झाला. याआधी, सिंधमधीलच आणखी एका घटनेत शांती मेघवार या विवाहित हिंदू महिलेचे चार सशस्त्र लोकांनी अपहरण केले होते. महिलेचे बळजबरीने धर्मांतर करून मंजूर शेख नावाच्या व्यक्तीशी लग्न केले होते . आपण ५,००० रुपयांची लाच देऊ शकलो नाही म्हणून एसएचओ इरफान डॅस्टिकोल यांनी एफआयआर नोंदवला नाही,अशी तक्रार पीडितेच्या आईने केला आहे.
हे ही वाचा:
बिहारमध्ये गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट, सात पोलिसांसह ३० जखमी
एसआरए घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांची चौकशी
राज्यात बसणार सायबर गुन्ह्यांना आळा
आता वैद्यकीय शिक्षण घेता येणार मराठीत
याशिवाय, हिंदूंसोबतच्या इतर घटनांमध्ये, सिंधमधील शिकारपूर जिल्ह्यात पुरामुळे विस्थापित झालेल्या नऊ वर्षांच्या मुलीवर अज्ञात व्यक्तींनी सामूहिक बलात्कार केला होता. मंगळवारी कराचीच्या क्लिफ्टन भागात दोन नराधमांनी मुलीला जबरदस्तीने कारमध्ये बसवले आणि तिच्यावर बलात्कार केल्यानंतर तिला हजरत अब्दुल्ला शाह गाझीच्या दर्गाजवळ सोडले. बुधवारी झालेल्या घटनेची दखल घेत सिंध उच्च न्यायालयाने उपमहानिरीक्षकांना २७ ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.