तेलंगणातील सिद्धीपेट जिल्ह्यातील एका गावाच्या सीमेवर सुमारे १०० माकडांचे मृतदेह आढळून आले आहेत.अचानकपणे एवढ्या मोठ्या संख्येने माकडे मृत पावल्याने भागात एकच खळबळ उडाली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुनिगडापातील काही गावकऱ्यांनी शनिवारी आपल्या शेतात बहुसंख्य प्रमाणात माकडे मृत झाल्याचे पाहिले.स्थानिकांनी या घटनेची माहिती अधिकाऱ्यांना दिली.यानंतर पशुवैद्यकीय विभागाला याची माहिती देण्यात आली.पशुवैद्यकीय आणि पशुसंवर्धन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, घटनास्थळाची पाहणी केली असता असंख्य प्रमाणात माकडे मृत स्वरूपात आढळले.विभागाच्या अधिकाऱ्यांनी मृत्यूचे कारण शोधण्यासाठी मृत माकडांचे नमुने गोळा करण्यात आले आहेत.
हे ही वाचा:
भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनचे पहिले सुवर्ण
हमास दहशतवाद्यांच्या हल्ल्याला इस्रायलकडून एअर स्ट्राईकने उत्तर
‘विक्रम आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा सक्रिय होणार नाहीत’
हमास दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर इस्त्रायलमध्ये ‘स्टेट ऑफ वॉर’ घोषित
हे नमुने हैदराबाद येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.या माकडांना दुसऱ्या ठिकाणी विष देऊन मारण्यात आल्याचा संशय असून नंतर त्यांचे मृतदेह गावाजवळ फेकण्यात आल्याचा आरोप स्थानिक आहेत.या प्रकरणी पोलीस तपास करत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.