24 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरक्राईमनामागेमिंग ऍपच्या माध्यमातून धर्मांतर करण्याचा घाट, पोलिसांनी केला पर्दाफाश

गेमिंग ऍपच्या माध्यमातून धर्मांतर करण्याचा घाट, पोलिसांनी केला पर्दाफाश

पोलिसांकडून एकाला अटक

Google News Follow

Related

उत्तर प्रदेश पोलिसांनी एका धर्मांतरण रॅकेटचा पर्दाफाश करत धक्कादायक खुलासा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोरवयीन मुलांना ऑनलाइन गेमिंग ऍप्लिकेशनद्वारे लक्ष्य करून त्यांचा धर्म बदलण्यासाठी प्रलोभन दाखवले जात होते. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. अब्दुल रहमान असे या आरोपीचे नाव आहे. गाझियाबादच्या सेक्टर २३ मधील जामा मशिदीमधून याला अटक करण्यात आली आहे.

‘फोर्टनाइट’ या ऑनलाइन गेमिंग ऍपच्या कथित वापराच्या संदर्भात एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. यामाध्यमातून धार्मिक परिवर्तनासाठी तरुण आणि प्रभावशाली मुलांना लक्ष्य करण्यात आले आहे. महाराष्ट्रामधील ठाण्यातील दुसरा आरोपी फरार असून त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार अल्पवयीन- गाझियाबादमधील दोन, फरिदाबाद आणि चंदीगडमधील प्रत्येकी एक गेमिंग ऍपद्वारे धर्मांतरित झाले आहेत. त्यांची ओळख पटली आहे.

आरोपी शाहनवाज खान हा ‘बद्दो’ या डिजिटल नावाने फोर्टनाईटवर खेळत असे. तो ‘फोर्टनाइट’ वर खेळत असलेल्या मुलांना शोधून लक्ष्य करत असे. जेव्हा ही किशोरवयीन मुले गेममध्ये हरत असत, तेव्हा त्यांना जिंकायचे असल्यास कुराणातील आयते वाचण्यास सांगितले जायचे. त्यामुळे ते खेळात जिंकल्यास त्यांचा कुराणावरील विश्वास वाढेल आणि पुढे ते ते इस्लाम स्वीकारतील असा डाव असल्याची माहिती गाझियाबाद (शहर) चे पोलिस उपायुक्त निपुण अग्रवाल यांनी दिली.

आरोपी ऑनलाइन गेमिंग ऍपच्या चॅटिंग प्लॅटफॉर्मवर लक्ष्यित मुलांच्या संपर्कात असायचे, ज्यामध्ये त्यांना झाकीर नाईक आणि तारिक जमील यांच्यासह कट्टर धर्मोपदेशकांचे व्हिडिओ दाखवले जात होते. तसेच या चॅटिंग इंजिनमध्ये युरोपच्या विविध भागांतील इतर मुलेही होती, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे या रॅकेटमध्ये आंतरराष्ट्रीय संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही मुले सुरुवातीला ख्रिश्चन होती पण नंतर इस्लाम धर्म स्वीकारण्यात आला.

हे ही वाचा:

नौदलाच्या हेवीवेट टोर्पेडोने पाण्याखालील लक्ष्य अचूक वेधले

दुर्गा देवीवरील अभद्र टिप्पणीबाबत उच्च न्यायालयाने कान उपटले

लोकशाहीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या राहुल गांधींना अमेरिकेचे सडेतोड उत्तर

‘बिपरजॉय’मुळे पावसाची आणखी प्रतीक्षा

गाझियाबादमध्ये धर्मांतरित झालेल्या एका हिंदू अल्पवयीन मुलाने सांगितले की तो द यूथ क्लब, पाकिस्तान-आधारित YouTube चॅनेल पाहत असे, ज्यामध्ये इस्लामबद्दल चिथावणी देणारे व्हिडिओ होते. तो तारिक जमीलचे व्हिडिओ पाहत असे, जो इस्लामवर कट्टर प्रवचन देत असे. ते व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याने धर्मांतर केल्याची माहिती डीसीपी अग्रवाल यांनी दिली आहे.

गाझियाबाद पोलीस पुढील तपासासाठी चंदीगड आणि फरिदाबाद येथे आहेत. या मोडस ऑपरेंडीचा कथित सूत्रधार शाहनवाज खान याला अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक महाराष्ट्रात रवाना झाले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा