उकळत्या चहाचे भांडे तोंडावर फेकल्याचा व्हीडिओ पण पोलीस म्हणतात तक्रारच नाही

उकळत्या चहाचे भांडे तोंडावर फेकल्याचा व्हीडिओ पण पोलीस म्हणतात तक्रारच नाही

उधारीचे पैसे मागीतले म्हणून चहा विक्रेत्याला चहाचे भांडे तोंडावर फेकून मारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मुंबईतील काळाचौकी येथील असल्याचे समोर आले आहे. चहा विक्रेत्याने या घटनेची तक्रार देण्यास नकार दिल्यामुळे काळाचौकी पोलिसांनी ठाणे डायरीत या घटनेची केवळ नोंद केली आहे.

मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या चहा विक्रेता चहा उकळवत असताना व्हिडीओत दिसणाऱ्या पिवळा टी शर्ट परिधान केलेला एक व्यक्ती चहा पिण्यासाठी चहाच्या टपरी आला व त्याने चहाची ऑर्डर दिली. चहा विक्रेत्याने त्या व्यक्तीकडे जुनी उधारी मागितली म्हणून संतापलेल्या पिवळा टी शर्ट वाल्याने चहाचे रिकामे भांडे चहा बनविणाऱ्या व्यक्तीला मारताना व्हिडिओत दिसते आहे. गॅसवर असलले उकळत्या चहाचे भांडे चहा बनविणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर पडल्याने तो भाजला.

हे ही वाचा:

कर्नाटक सरकारने शेपूट घातले; हुबळी दंगलप्रकरणातले खटलेच मागे घेतले!

हिज्ब-उत-तहरिर आता दहशतवादी संघटना!

जोगेश्वरी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यु

हैदराबादमध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीची विटंबना

हा सर्व प्रकार चहाच्या टपरीत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे, हे फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर काळाचौकी पोलिसांनी चहा विक्रेत्याला बोलावून त्याची तक्रार दाखल करून घेण्याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता चहा विक्रेत्याने तक्रार देण्यास नकार दिला. आपसातील वाद असून आम्ही बघून घेऊ आम्हाला तक्रार द्यायची नाही, असे त्यांनी पोलिसांना सांगितले असल्याची माहिती काळाचौकी पोलिस ठाण्यातील एका अधिकारी यांनी दिली.

त्या व्यक्तीला तक्रार द्यायची नाही असे आम्ही त्याच्याकडे लिहून ठाणे डायरीत त्याची नोंद केली असल्याचे अधिकारी यांनी म्हटले आहे. या घटनेचे फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून याबाबत सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.

Exit mobile version