उमेश पाल हत्याकांडात बॉम्बफेक करणारा गुड्डू मुस्लिमला नाशिकमधून घेतले ताब्यात

उमेश पाल हत्याकांडात बॉम्ब फेक करणारा असदचा सहकारी

उमेश पाल हत्याकांडात बॉम्बफेक करणारा गुड्डू मुस्लिमला नाशिकमधून घेतले ताब्यात

उमेश पाल हत्याकांडातील आरोपी असद अहमद गेल्या आठवड्यात झाशी येथे झालेल्या चकमकीत ठार झाला. उमेशच्या हत्येनंतर असद फरार होता. आता त्याचे नाशिक कनेक्शन उघड झाले असून तो काही काळ नाशिकमध्ये वास्तव्यात असल्याचे देखील समोर आले आहे त्याला मदत करणाऱ्या एका हस्तकाला ज्याचे नाव गुड्डू मुस्लिम आहे, त्याला उत्तर प्रदेश पथकाने ताब्यात घेतली असून अधिक चौकशीसाठी त्याला लखनऊला नेण्यात आलेय.

यासंदर्भात पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार उत्तर प्रदेश मधील गुंड अतिक अहमद यांचा तिसरा मुलगा असद अहमद हा ज्यावेळी दिल्लीवरून लपण्यासाठी पळाला होता त्यावेळी तो पुण्याला जाण्यापूर्वी काही काळ नाशिकमध्ये थांबला होता हे आता उत्तर प्रदेशच्या एटीएस कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पुणे येथे असदला मदत करणाऱ्या व्यक्तींचा शोध सुरू आहे. परंतु, नाशिक मध्ये असलेला मदत करणाऱ्या एका व्यक्तीला उत्तर प्रदेश एटीएस पथकाने ताब्यात घेतले असून नाशिकच्या पाथर्डी या परिसरातून या व्यक्तीला ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले. दरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांनी नाशिक पोलिसांना काहीच माहिती दिली नाही. त्यामुळे नाशिक पोलिसांकडे याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. ज्यावेळी असद नाशिकला आला होता त्यावेळी तो ओळख लपून राहत असल्याचे समोर आलेय. परंतु पोलिसांनी याबाबत काहीच माहिती दिलेली नाही.

हे ही वाचा:

ब्रिटनमधील जगदंबा तलवार, वाघनखे शिवराज्याभिषेकाला भारतात येतील?

‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जनसागराच्या चरणी अर्पण

देशात कोविडचे १०,०९३ नवे रूग्ण, तरीही किंचित घट

दुहेरी हत्याकांडानंतर उत्तर प्रदेशात कलम १४४ लागू

अतीक अहमदचा मुलगा असद याने उमेश पाल हत्याकांड केले होते. त्याचे नुकतेच एन्काऊंटर झाले. त्याच्यावर ५ लाखांचे इनामही लावण्यात आले होते. पण तो फरार होता. मात्र नंतर तो झाशी येथे असल्याचे कळल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिस त्याला अटक करण्यास गेले. तेव्हा चकमकीत तो मारला गेला.

Exit mobile version