गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान…

गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान…

शिक्षकांच्या नावावर काळीमा फासणारी दुर्दैवी घटना राजस्थानमध्ये घडली आहे. राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील कोलासर गावातून हृदयद्रावक बातमी आली आहे. गावातील एका खासगी शाळेतील शिक्षकाने इयत्ता सातवीच्या मुलाला वर्गात मारहाण केली. त्याचा दोष एवढाच होता की त्याने गृहपाठ केला नव्हता. ही मारहाण इतकी भयंकर होती की, या मारहाणीत मुलाचा जीव गेला.

अभ्यास केला नाही या कारणावरून शिक्षकाने मुलास मारायला सुरुवात केली. ही मारहाण इतकी भयंकर होती की, मुलाला आपले प्राणच गमवावे लागले. झालेल्या घटनेबद्दल खेद व्यक्त करत राजस्थानचे शिक्षणमंत्री गोविंद दोतसरा यांनी शाळेची मान्यता रद्द करण्याचे आदेश आता दिलेले आहेत. गृहपाठ न केल्याबद्दल शिक्षकाने इतका मार दिला की, या मारहाणीत मुलाने प्राणच गमावला. सदर प्रकरणाची पूर्ण चौकशी होईपर्यंत शाळेची मान्यता स्थगित करण्याचे आदेश आता अधिकारी वर्गाला देण्यात आलेले आहेत.

हे ही वाचा:

पवारांच्या शागिर्दाने १५ हजार कोटी रुपये लुटले

सोशल मीडियामध्ये येणार नवे ‘ट्रम्प’कार्ड

आंदोलकांना रस्ते अडवण्याचा अधिकार नाही

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारकडून मोठी भेट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलासर गावातील पब्लिक स्कूलमध्ये दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली. मृत बालक गणेशचे वडील ओमप्रकाश यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी शिक्षक मनोज सिंगला अटक केली. त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गृहपाठ केला नाही म्हणून, रागामध्ये मनोज सिंहने वर्गातच निर्घृणपणे मारहाण केली. शिक्षकाने मुलाला जमिनीवर आपटले, तसेच थोबाडीतही लगावल्या. यामध्ये विद्यार्थी गणेशच्या नाकातून रक्त वाहू लागले. त्यानंतर तो बेशुद्ध पडला. यामुळे घाबरून आरोपी मनोज सिंह त्याला रुग्णालयात घेऊन गेला, तिथे डॉक्टरांनी गणेशला मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

Exit mobile version