29 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरक्राईमनामातौसिफ़, रिहाननेच केला निकिता तोमरचा खून...न्यायालयाचा फैसला

तौसिफ़, रिहाननेच केला निकिता तोमरचा खून…न्यायालयाचा फैसला

Google News Follow

Related

हरियाणाच्या फरिदाबाद फास्ट ट्रॅक न्यायालयाने निकिता तोमर हत्या प्रकरणात महत्वपूर्ण निकाल दिला आहे. बुधवारी फरिदाबद्द न्यायालयात निकिता तोमर प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणात मुख्य आरोपी तौसिफ़ आणि त्याचा सहकारी रिहान हे दोघेही दोषी आढळले आहेत. तौसिफ़ आणि रिहान यांनीच निकिता हिची निर्घृण हत्या केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले आहे. शुक्रवारी या दोघांनाही शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

काही महिन्यांपूर्वी हरियाणात घडलेल्या निकिता तोमर हत्या प्रारणामुळे सारा देश हादरला होता. भर दिवसा घडलेल्या या हत्याकांडात निकिताच्या कुटुंबियांकडून हा गुन्हा ‘लव्ह जिहादचा’ भाग असल्याचा आरोप करण्यात आला होता. निकिताचा गुन्हेगार असलेला तौसिफ़ हा निकिताच्या वर्गात होता. इतकाच नाही तर त्याचे निकितावर एकतर्फी प्रेमसुद्धा होते.

२६ ऑक्टोबर २०२० रोजी २१ वर्षीय निकिता आपला पेपर संपवून अगरवाल महाविद्यालयातून बाहेर पडत होती. बीकॉमच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणारी निकिता पेपर चांगला गेल्यामुळे खुशीत होती. पण तिच्या आयुष्यातला हा शेवटचा आनंद असेल याची कल्पना ना निकिताला होती, ना तिच्या कुटुंबियांना. तौसिफ़ आणि रिहान हे निकिताचा पेपर संपायची वाटच बघत होते. निकिता कॉलेजमधून बाहेर पडलेली दिसल्यावर तौसिफ़ आणि रिहानने आपली गाडी सुरु केली. ती गाडी निकिताच्याच दिशेने येत होती. निकिताजवळ गाडी थांबवत दोघेही गाडीतून उतरले आणि निकितासमोर उभे ठाकले. त्या दोघांना तिथे बघून निकिताला धक्का बसला. तिला काही समजायच्या आत त्यांनी निकिताच्या हाताला धरत जाबरदस्ती तिला गाडीत कोंबण्याचा प्रयत्न केला. पण निकिताने हार मानली नाही. ती संघर्ष करत होती. त्या दोघांच्या तावडीतून सुटायचा प्रयत्न करत होती. एक मुलगी दोन तरुणांवर भारी पडत होती. निकिताला किडनॅप करण्याचा प्लॅन फसताना दिसत होता. तौसिफ़ आणि रिहानला हे सहन होणे शक्यच नव्हते. संतापलेल्या तौसिफ़ने अखेर बंदूक काढली आणि निकितावर ताणली. तौसिफच्या हातातली बंदूक बघून निकिताही घाबरली पण तिला काही कळायच्या आतच तौसिफने बंदुकीचे ट्रिगर दाबले. बंदुकीच्या गोळ्यांनी निकिताच्या देहाची चाळण झालीं आणि जागीच तिचा मृत्यू झाला.

हे ही वाचा:

आंतरराष्ट्रीय उड्डाणांना एप्रिल पर्यंत स्थगिती

वाझे ठरतोय लादेन मार्गी

प्रकरण गंभीर, पण राऊत खंबीर

देशात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असलेल्या दहा जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रातले

हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला. २७ ऑक्टोबर रोजी या प्रकरणात एसआयटी नेमण्यात आली. एसीपी अनिल कुमार यादव यांच्या नेतृत्वात एसआयटीने आपला तपास पूण केला. नोव्हेंबर रोजी या प्रकरणात ७०० पानांची चार्जशीट दाखल करण्यात आली. यात एटीएसने ६० साक्षी नोंदवल्या आहेत. या प्रकरणात हत्येचा कट रचणे, किडनॅप करणे, हत्या करणे या गुन्ह्यांची कलमे लावण्यात आली आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा