टॉवरवर जीवघेणे स्टंट करणे पडले महागात

ताडदेव पोलीसांनी दोघा परदेशी नागरिकांना थरारक नाट्यांनंतर केले अटक

टॉवरवर जीवघेणे स्टंट करणे पडले महागात

मसालेदार हिंदी चित्रपटांत सिनेमाचा मुख्य नट इकडून तिकडे वेडे चाळे करत फिरत असतो आणि त्याला पकडण्यासाठी पोलीस त्याच्या मागावर राहून अखेर त्याला पकडून जेरबंद करतात. असाच काहीसा सीन पण रील लाइफचा नसून रिअल लाइफचा ताडदेव पोलिसांना आला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, ताडदेव मुंबई येथील ट्वीन टॉवर असलेले इंपिरियल ट्वीन टॉवर कॉम्प्लेक्स येथे दोन परदेशी यूट्यूबरना जीवघेणा स्टंट करण महागात पडले आहे.कोणाचीही परवानगी न घेता त्यांनी ह्या टॉवरवर चढण्याचा प्रयन्त केला. जीवघेणी स्टंटबाजी करणाऱ्या दोघांना मुंबई पोलीसांनी ताब्यात घेतले असून दोघांना पोलीस स्थानकांत ठेवले असून रशियन दूतावासाला याबाबत कळविले आहे. मुंबईमधील इम्पीरियल ट्विन टॉवर कॉम्प्लेक्समध्ये दोन रशियन यूट्यूबर्स स्टंट करण्यासाठी गेले होते.

ट्विन टॉवर कॉम्प्लेक्समधील सुरक्षा रक्षकांना ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी थेट ताडदेव पोलिसांना ही बाब कळविली. पोलीसांनी तात्काळ धाव घेत दोघांना पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले होते. मात्र दोघेही स्टंट करत पोलिसांना चकवा देत होते. पोलीस मागे आणि ते दोघे पुढे असा तब्बल दोन तास थरार ट्विन टॉवर कॉम्प्लेक्समध्ये सुरू होता, हा संपूर्ण थरार सुरू असतांना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दोन तासांच्या नाट्या नंतर मुंबई पोलिसांना दोघांना पकडण्यात यश आल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

ताडदेव पोलीसांनी सुरक्षा रक्षकांच्या संपर्कांनंतर धाव घेत दोघा रशियन युट्युबर्सना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते, अडीच तासांच्या प्रचंड नाट्यमय घडामोडी देखील यावेळी घडल्या आहेत.

हे ही वाचा:

भातखळकरांची टीका; राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी विरोधकांचा खेळ

आदित्य, राष्ट्रवादीचा शेवाळे प्रकरणाशी काय संबंध?

पवारांचा वारकऱ्यांना संयमाचा सल्ला

सीमावर्ती बांधवाना वाऱ्यावर सोडणार नाही.. इंच इंच लढू

रशियन युट्युबर्सना पकडल्यानंतर खाजगी मालमत्तेत घुसखोरी करणे, जीव धोक्यात घालून स्टंट व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करणे या कलमांखाली ताडदेव पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे, परदेशी नागरिक स्टंट करताना पकडले जाण्याची ही पहिलीच वेळ नसून यापूर्वी देखील दोन वेळेला अशी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये २०१८ मध्ये प्रभादेवी येथे सहा परदेशी नागरिकांना पार्कर करतांना पकडण्यात आले होते असे सूत्रांकडून कळले आहे. याशिवाय २०२१ मध्ये वांद्रे-वरळी सी लिंकवर दोन रशियन नागरिक पकडले गेले होते, गेल्या काही वर्षात मुंबईत परदेशी नागरिक जीवघेणे स्टंट करतांना दिसून येत आहे.

ताडदेव पोलीसांनी अटक केलेल्या या रशियन नागरिकांची मक्सिम शचरबाकोव आणि रोमन प्रोशिन अशी त्यांची नावे आहेत. त्यांना पोलीस ठाण्यातच ठेवण्यात आले असून त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची माहिती रशियन दूतावासाला कळविण्यात आली आहे.

Exit mobile version