तुनिशा मृत्यु प्रकरणी लव्ह जिहादच्या अनुषंगाने तपास

आत्महत्येच्या १५ दिवसांपूर्वीच शिझान याने तुनिशाला सोडून दिले होते, त्यानंतर तुनिशा ही नैराश्यात गेली होती

तुनिशा मृत्यु प्रकरणी लव्ह जिहादच्या अनुषंगाने तपास

“तुनिशा शर्मा मृत्यू  प्रकरण आम्ही लव्ह जिहादची बाजू तपासणार आहे, असे  वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी म्हटले आहे. ‘अलिबाबा दास्तान -ए- काबूल’ या टीव्ही सिरीयल मधील मुख्य भूमिका साकारणारी तुनिशा शर्मा या अभिनेत्रीच्या मृत्यू प्रकरणी वसईच्या वालीव पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यात शीझान मोहम्मद खान याला शनिवारी अटक केली.

तुनिशा शर्मा मृत्यू हे प्रकरण ‘लव्ह जिहाद’शी संबंधित असल्याच्या आरोप होत असून “आम्ही लव्ह जिहादची बाजू तपासणार आहे, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी म्हटले आहे. तुनिशा शर्मा ही हिंदी टीव्ही सिरीयल मधील टॉपची अभिनेत्री म्हणून ओळखली जात होती, अनेक टीव्ही सिरीयल मध्ये तिने महत्वाची भूमिका निभावली असून काही हिंदी चित्रपटात देखील सहभूमीका केली आहे.

सध्या ती ‘अलिबाबा दास्तान -ए- काबूल’ या टीव्ही सिरीयल मधील मुख्य भूमिका साकारत होती. वसईत असलेल्या टीव्ही सिरीयलच्या सेटवरील आराम करण्याच्या खोलीत तुनिशा हिने गळफास लावून आत्महत्या केल्याचे शनिवारी दुपारी ४ वाजता समोर आले. २४ वर्षाची तुनिशा शर्माला तिच्यासोबत काम करणारा तिच्या दुप्पट वयाचा सह कलाकार शीझान मोहम्मद खान याने चार महिन्यापूर्वीच आपल्या प्रेमजाळ्यात ओढले होते.

तुनिशा हिच्या आत्महत्येच्या १५ दिवसांपूर्वीच शिझान याने तुनिशाला सोडून दिले होते, त्यानंतर तुनिशा ही नैराश्यात गेली होती, त्यातच तिने आत्महत्या केली, तुनिशा हिच्या मृत्यूला शिझान हा जवाबदार असल्याची तक्रार तुनिशा च्या आईने केली, त्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून शिझानला वालीव पोलिसांनी रविवारी अटक केली.मात्र हे प्रकरण दिसते तसे साधेसुधे नसून लव्ह जिहादशी निगडीत असल्याचा आरोप काही हिंदू संघटनांकडून केला जात आहे.

“आम्ही तुनिशा हिच्या मृत्युबाबत सर्व बाजू तपासून पहात आहोत, त्याच बरोबर हे प्रकरण लव्ह जिहादशी निगडित आहे का याचा देखील तपास केला जाणार आहे, असे मीरा-भायंदर वसई विरार पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकारी यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

उपनगरातील भाडेकरू इमारतींना न्याय मिळणार!

मुघलांच्या फौजेला साहिबजादे निर्भयपणे सामोरे गेले! त्यांच्या चरणी नतमस्तक

शिवसेनेचे खासदार , व्हिडिओकॉन समूहाचे अध्यक्ष वेणूगोपाळ धूत यांना अटक

प्रेयसीच्या चेहऱ्यावर लाथाबुक्के मारणाऱ्याचे घर केले उद्ध्वस्त

 

श्रद्धा वालकर प्रकरणानंतर चंदेरी दुनियेतील अनेकांचे ब्रेकअप...

टीव्ही सिरीयल, फिल्मी दुनिया म्हणजेच चंदेरी दुनिया या चंदेरी दुनियेत अनेक कलाकार काम करतात, त्यात सर्व जाती धर्माचे कलाकार आहेत. अनेक कलाकारांचे आपल्या सह कलाकार असणाऱ्या अभिनेत्रीसोबत प्रेमप्रकरणे सुरू आहेत, चंदेरी दुनियेत प्रेम, अफेअर,डेटिंग या गोष्टीला गंभीरपणे कोणीही घेत नाही, या ग्लॅमरस दुनियेत जात धर्म पाळला जात नाही असे म्हटले जाते.

वसई येथे राहणारी श्रद्धा वालकर हिची नोव्हेंबर महिन्यात दिल्लीत क्रूरपणे हत्या करण्यात आली, मारेकरी हा दुसरा तिसरा कोणी नसून तिचा प्रियकर आफताब निघाला. श्रद्धा प्रकरणानंतर संपूर्ण देश हादरला होता. श्रद्धा वालकर प्रकरणानंतर चंदेरी दुनियेतील अनेक आंतरजातीय प्रेमप्रकरणे तुटली, त्यातील एक प्रकरण म्हणजे तुनिशा आणि शिझान हे आहे. “श्रद्धा वालकर प्रकरणानंतर आमचा विवाह होऊच शकणार नसल्यामुळे मी स्वतः तुनिशा सोबत संबंध तोडले, आमचे ब्रेकअप झाले, त्यानंतर तिला नैराश्य आले होते, याची कल्पना मी तिच्या आईला दिली होती, तुमची मुलीला सांभाळा ती नैराश्यात आहे असे मी सांगितले होते, असे शिझान याने पोलिसांच्या चौकशीत माहिती दिल्याचे कळते.

Exit mobile version