तामिळ संगीतकार, अभिनेता विजय अँटनी यांच्या मुलीने केली आत्महत्या !

मानसिक तणावामुळे उचलले टोकाचे पाऊल

तामिळ संगीतकार, अभिनेता विजय अँटनी यांच्या मुलीने केली आत्महत्या !

संगीतकार, अभिनेता आणि निर्माते विजय अँटोनी यांची मुलगी मीरा हिने चेन्नई येथील राहत्या घरी आत्महत्या केली. ती १६ वर्षांची होती.चेन्नईच्या टीटीके रोड येथील तिच्या घरात ती पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली.

विजय अँटनी हे एक लोकप्रिय संगीतकार आहेत, ते प्रामुख्याने तमिळ सिनेमात काम करतात. अनेक वर्षे संगीतकार राहिल्यानंतर ते निर्माता, अभिनेता, गीतकार, संपादक, ऑडिओ अभियंता आणि दिग्दर्शकही झाले.त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मंगळवार दि.१९ सप्टेंबर रोजी विजय अँटनी यांची मुलगी मीरा हिने चेन्नईच्या अलवरपेट येथील त्यांच्या राहत्या घरी पहाटे ३ वाजता तिने पंख्याला लटकून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.ती १६ वर्षांची होती आणि चेन्नईतील एका लोकप्रिय शाळेत शिकत होती.मीरा घरी लटकलेल्या अवस्थेत सापडल्यानंतर घरातील मदतनीसांनी एका खाजगी रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.

हे ही वाचा:

महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

गणेश चतुर्थीच्या तोंडावर मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची धमकी

खर्गेचे G2 आणि गोयल म्हणाले 2G, One G, son G !

महाराष्ट्रात ‘शांतता’ आणि ‘सलोखा’ हाच त्या बैठकीचा अजेंडा…

मिळालेल्या माहितीनुसार मीरा ही मानसिक तणावाने ग्रस्त असल्यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे असे म्हटले जात असून या आजारातून बरी होण्यासाठी तिच्यावर उपचारही चालू असल्याची माहिती मिळाली आहे.पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन अधिक तपास करत आहेत.या दुर्दैवी घटनेने अभिनेता आणि त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे.विजय अँटनीच्या मुलीच्या मृत्यू झाल्याचे कळताच चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांकडून शोक व्यक्त केला जात आहे.जयम रवी, सरथकुमार, दिग्दर्शक व्यंकट प्रभू, राघव लॉरेन्स, आरजे बालाजी आणि चित्रपटसृष्टीतील इतर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर कुटुंबाला शोक व्यक्त केला.

Exit mobile version