21 C
Mumbai
Thursday, January 16, 2025
घरक्राईमनामाकंदहार पडले, तालिबानची राजवट अटळ?

कंदहार पडले, तालिबानची राजवट अटळ?

Google News Follow

Related

अफगाणिस्तानमधील परिस्थिती वेगाने चिघळत असून देश अनागोंदीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. देशातील दुसरं मोठं आणि महत्वाचं शहर असलेल्या कंदहारवर आता तालिबान्यांनी कब्जा मिळवल्याचं स्पष्ट झालं आहे. तालिबानी दहशतवादी आता ज्या वेगाने एक-एक प्रदेशावर कब्जा मिळवत आहेत ते पाहता त्यांच्यासाठी आता राजधानी ‘काबुल दूर नही’ अशी काही परिस्थिती आहे.

तालिबान्यांनी कंदहारवर कब्जा मिळवल्यानंतर आता ते काबुलकडे कूच करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे अमेरिकेने आपल्या नागरिकांना अफगाणिस्तान सोडण्याचा सल्ला दिला आहे. तसेच तालिबान्यांनी अमेरिकन दूतावासाला लक्ष्य करु नये असंही सांगितलं आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी अफगाणिस्तानमधून आपलं सैन्य माघारी घेण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेच्या या निर्णयामुळे जगाला वाटत असलेली चिंता आता खरी होताना दिसत आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून त्यांनी मोठ्या भूभागावर वर्चस्व मिळवल्याचं स्पष्ट झालंय.

अफगाणिस्तानमधीला या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी कतारची राजधानी दोहा या ठिकाणी बैठकीचे सत्र सुरु आहे. यामध्ये चीन, अमेरिका, पाकिस्तान, रशिया या देशांचा समावेश असून त्यामध्ये भारतालाही उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे.

हे ही वाचा:

लॉर्ड्स कसोटीचा पहिला दिवस भारताच्या नावावर

दोन लसी घेतलेल्यांचे ‘तिकीट कापले’

महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची ट्विटर खाती लॉक

ठाकरे सरकारची गोंधळवृत्ती; शिष्यवृत्ती परीक्षा फक्त मुंबईत रद्द

अफगाणिस्तानमधील तालिबान्यांच्या मदतीने लष्कर-ए-तोयबा आणि भारतात सक्रिय असलेल्या इतर दहशतवादी संघटना या कंदहारमधील भारतीय दूतावासाला लक्ष्य करु शकतात अशी शक्यता गुप्तचर खात्याने वर्तवली होती. त्यामुळे या आधीच भारताने आपल्या दूतावासातील अधिकाऱ्यांना विशेष विमानाने सुरक्षित भारतात आणलं आहे. त्यानंतर भारताने कंदहार नंतर मजार-ए-शरीफमधील आपले वाणिज्य दूतावास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत सरकारने आपले मुत्सद्दी, अधिकारी आणि इतर भारतीयांना परत आणण्याचा निर्णय घेतला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
222,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा